मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्याचा फटका वाहन उद्योगाला बसलेला आहे. गेल्या दोन महिन्यात मुंबईसह राज्यात पेट्रोल वाहनांची विक्री तब्बल 30 टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे आता नागरिकांकडून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर भर देत आहे. सीएनजी वाहनांची 375 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांची संख्यासुद्धा 40 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
पेट्रोल वाहनांची खरेदी 30 टक्क्यांनी घसरली-
एक लिटर पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ पोहचल्याने गेल्या तीन महिन्यात राज्यात पेट्रोल वाहनांची खरेदी 30 टक्यांनी घसरली आहे. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये पेट्रोलवर धावणाऱ्या 2 लाख 10 हजार 715 वाहनांची विक्री झालेली होती. तर जानेवारी 2021 मध्ये 1 लाख 66 हजार 72 पर्यंत पोहोचली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात 1 लाख 49 हजार 820 पेट्रोलवर चालणार्या वाहनांची खरेदी झालेली आहे. डिसेंबरमहिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात 60 हजार 935 वाहन खरेदी घटली आहे.
सीएनजी वाहनांच्या विक्रीत 375 टक्के वाढ-
प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पेट्रोल सीएनजी वाहनांनी पसंती देण्याचा सूचना परिवहन विभागाकडून केली जाते. आता तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिकांकडून आर्थिक दृष्ट्या सीएनजी आणि इलेक्ट्रिकल वाहनांना पसंती देत आहे. डिसेंबर 2020 मध्ये 610 सीएनजी वाहनांची खरेदी झालेली होती. जानेवारी 2021 मध्ये 810 सीएनजी वाहनांची खरेदी झाली होती. मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सीएनजी वाहनांची लक्षणीय खरेदी झालेली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये तब्बल 2 हजार 288 सीएनजी वाहनांची नागरिकांकडून खरेदी केली. त्यामुळे सीएनजी वाहनांच्या खरेदीत 375 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत 40 टक्क्यांची वाढ-
गेल्या काही वर्षापासून बाजारात इलेक्ट्रिक वाहन आले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदीसुद्धा 40 टक्क्यांनी महाराष्ट्रात वाढलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर 2020 मध्ये 1 हजार 102 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली होती तर जानेवारी 2021मध्ये 1हजार 122 आणि फेब्रुवारी महिन्यात 1 हजारब429 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - तपास यंत्रणांकडून मानसिक छळ होतोय; मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे केली होती तक्रार
हेही वाचा - महत्वाची बातमी : आज रात्रीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रणाली राहणार बंद