ETV Bharat / city

लखीमपूर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, राज्याच्या तपास यंत्रणा योग्य तपास करणार नाहीत - सचिन पायलट - सचिन पायलट यांची मागणी

लखीमपूर प्रकरणानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार घाबरले असून, काँग्रेसच्या नेत्यांना घटनास्थळी जाऊ दिले जात नाही, असा आरोपही पायलट यांनी केला आहे. लखीमपूर खीरी घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घटनास्थळी निघाल्या असता त्यांनादेखील जाण्यास पोलिसांनी बंदी आणली. एका महिला नेत्यांना रात्रभर दडवून ठेवण्यात आले. तसेच त्यांच्याबरोबर दुर्व्यवहार केला असल्याचाही आरोपही यावेळी सचिन पायलट यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

सचिन पायलट
सचिन पायलट
author img

By

Published : Oct 4, 2021, 5:38 PM IST

मुंबई - लखीमपूर खीरी घटनेची न्यायालयीन चौकशी होणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि तपास यंत्रणा या घटनेची योग्य चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. या घटनेच्या विरोधात काँग्रेसने मंत्रालय परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली. यावेळी काँग्रेस नेते सचिन पायलेट, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासहित काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

लखीमपूर प्रकरणानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार घाबरले असून, काँग्रेसच्या नेत्यांना घटनास्थळी जाऊ दिले जात नाही, असा आरोपही पायलट यांनी केला आहे. लखीमपूर खीरी घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घटनास्थळी निघाल्या असता त्यांनादेखील जाण्यास पोलिसांनी बंदी आणली. एका महिला नेत्यांना रात्रभर दडवून ठेवण्यात आले. तसेच त्यांच्याबरोबर दुर्व्यवहार केला असल्याचाही आरोपही यावेळी सचिन पायलट यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

'यूपी आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात'

जवळपास गेल्या वर्षभरापासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. मात्र त्याची साधी दखलही केंद्र सरकार घेत नाही. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मोहन लाल खट्टर हे शेतकऱ्यांना लाटेने मारण्याचा आदेश देतात. सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप सचिन पायलट यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे उभा राहणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असून आपण शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

'21 हजार कोटींच्या जतबाबत अद्याप कारवाई नाही'

व्यवसायिक गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या मुद्रा पोर्टवर 21 हजार कोटींचे ड्रस जप्त करण्यात आले. मात्र याबाबत गुजरातच्या पोलीस आणि तपास यंत्रणेने कोणतीही मोठी कारवाई केलेली नाही. 3000 किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रेसची खेप मुद्रा पोर्टवर नेमकी आली कशी? याबाबत चौकशी होणे गरजेच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स पाहता देशातील तरुणांना नशेच्या खाईत ढकलण्यासाठी नेमक कोण काम करते? हे समोर येणे गरजेचे असून, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिन पायलट यांनी मुंबईत केली आहे.

'केंद्र सरकारच्या चुकीच्या नितीमुळे देशाची दयनीय स्थिती'

देशात गेल्या सात वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. या सरकारने सात वर्षात अनेक घोषणा केल्या. मात्र केंद्र सरकारने केलेल्या घोषणा आणि योजनांचा देशातील सर्वसामान्य जनतेला कोणताही फायदा झालेला नाही. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी केंद्र सरकारच्या नीतीमुळे देशोधडीला लागले. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष आपला आवाज अजून तीव्र करणार असून, पुढील काळामध्ये संपूर्ण देशभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन आणि निदर्शने केली जातील, अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली.

हेही वाचा - 'उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.