ETV Bharat / city

हरयाणात 'जालियनवाला बाग', तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी कोण करणार? - शिवसेना - शेतकरी आंदोलन

शेतकऱयांची डोकी फोडणारे हरयाणा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा'' अशी मागणी आता कोणी करणार आहे काय? मोदी सरकारातील एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देतो. त्याबद्दल त्याच्यावर 'सूक्ष्म' कायदेशीर कारवाई होताच ''महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा हो'' अशा बोंबा ठोकणारे हेच लोक हरयाणातील रक्तबंबाळ शेतकऱयांचे चित्र पाहून गप्प आहेत, असा सवाल शिवसेनेने भाजपाला केला आहे.

हरयाणात 'जालियनवाला बाग'
हरयाणात 'जालियनवाला बाग'
author img

By

Published : Aug 30, 2021, 8:02 AM IST

मुंबई - शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावे यासाठी पंजाब हरियाणाचा शेतकरी घरदार सोडून जवळपास वर्षभरापासून रस्त्यावर उतरला आहे. आपल्या हक्कासाठी उतरलेल्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल तर नाहीच, मात्र मुजोर अधिकाऱ्यांना हाताला धरून शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचा प्रकार आता सुरू झाला आहे. कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची डोकी फोडली जात असल्याच्या प्रकरणावरून शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनामधून हरियाणामध्ये जालियनवाला बाग झाल्याचे म्हणत खट्टर सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

हरयाणातील 'खट्टर' सरकारला सत्तेवर राहण्याचा थोडाही अधिकार नाही

अमृतसरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच अगदी बाजूला हरयाणामध्ये शेतकऱयांचे दुसरे 'जालियनवाला बाग' घडत होते, पण ना दिल्लीचे सरकार जागचे हलले ना महाराष्ट्रातील 'जन आशीर्वाद' यात्रेला हुंदका फुटला. एक मात्र नक्की, सरकार ज्या निर्घृणतेची बीजे पेरत आहे, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत. देशातील शेतकऱयांनी उठाव करावा व बळीराजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यावा असे हे प्रकरण आहे. हरयाणातील 'खट्टर' सरकारला सत्तेवर राहण्याचा थोडाही अधिकार नाही, पण ''शेतकऱयांच्या रक्ताचे पाट वाहिले म्हणून खट्टर सरकारला जन आशीर्वादाचा अभिषेक लाभला'' असे सांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत, अशी टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.

ब्रिटिश राजवटीत शेतकऱयांच्या विरोधात कायदे करणाऱया सायमनविरोधात शेतकऱयांचे नेते लाला लजपतराय रस्त्यावर उतरले तेव्हा ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना असेच डोकी फुटेपर्यंत मारले. त्यातच लालाजींचा अंत झाला. आज हरयाणातही तेच घडले. भाजपच्या राज्यस्तरीय बैठका सुरू असताना शेतकऱयांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात फक्त घोषणा दिल्या म्हणून पोलिसांनी सरकारी आदेशाने शेतकऱयांचा खून करण्याचा प्रयत्न केला, अशी घणाघाती आरोप शिवसेनेने भाजपावर केला आहे.

महाराष्ट्रात बोंबाबोंब करणारे आता हरियाणात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का

अफगाणिस्तानात तालिबानी ज्या पद्धतीचा हिंसाचार घडवून माणसे मारीत आहेत, त्याच तालिबानी पद्धतीने हरयाणाच्या भाजप सरकारने शेकडो शेतकऱयांची डोकी फोडून भारतमातेची भूमी रक्ताने भिजवली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हा रक्तपात झाला. त्यामुळे ''शेतकऱयांची डोकी फोडणारे हरयाणा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा'' अशी मागणी आता कोणी करणार आहे काय? मोदी सरकारातील एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देतो. त्याबद्दल त्याच्यावर 'सूक्ष्म' कायदेशीर कारवाई होताच ''महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा हो'' अशा बोंबा ठोकणारे हेच लोक हरयाणातील रक्तबंबाळ शेतकऱयांचे चित्र पाहून गप्प आहेत. असा सवाल शिवसेनेने भाजपाच्या नेत्यांना आणि वारंवार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणाऱ्यांना केला आहे.

कोण हा उपजिल्हाधिकारी आयुष सिन्हा? शेतकऱयांची डोकी फोडा, असा बेगुमानपणे आदेश देतोय. हा अधिकारी क्षणभरही नागरी सेवेत राहता कामा नये. त्याच्या बडतर्फीचे काम तरी सरकार करू शकते की नाही? सरकारला जन आशीर्वाद हवा आहे, तो शेतकऱयांची अशी डोकी फोडून मिळणार आहे काय? असा सवाल करत त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

खट्टर सरकारच्या सैतानी-राक्षसी हल्ला दिसला नाही का?

एका मंत्र्यावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली म्हणून राज्य सरकार असहिष्णू कसे यावर बोलले गेले. मात्र आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱयांनी फक्त घोषणा दिल्या म्हणून पोलिसांनी बेकायदेशीरपणे त्या निरपराध लोकांची डोकी फोडली. एवढे होऊनही सोयिस्कर मौन बाळगणारा भाजप महाराष्ट्रात मंत्र्यास खाऊन-पिऊन जामीन देऊन सोडले तरी थयथयाट करीत आहे. जरा त्या खट्टर सरकारच्या सैतानी-राक्षसी हल्ल्यांकडे पहा. रक्ताने ओघळणारी शेतकऱयांची डोकी, वेदनेने थरथरणारी शरीरे पहा. ती तुम्हाला का दिसत नाहीत? असा सवाल करत शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टीकेची झो़ड उठवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.