मुंबई - खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा (Rana Couple Tea Controversy) यांनी आपल्याला कारागृहामध्ये वाईट वागणूक दिली असल्याचा आरोप केला आहे. आपल्याला जातीवाचक बोलले गेले असून, पाणीही दिले नाही. तसेच शौचालयाला जाऊ दिले नाही, असेही आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana Allegation on Police) यांनी केले होते. आता याबाबतचा एक व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Share Rana Video) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या मुद्द्यावर आता सत्ताधारी आणि विरोधकांध्ये जुंपली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केला पुनरुच्चार - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राणा यांच्यावर झालेल्या कथित अत्याचाराचा पाढा वाचला. राणा यांना पाणीसुद्धा दिले नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता.
-
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
संजय पांडे यांनी ट्विट केला व्हिडिओ - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलिसांनी राणा यांना केवळ पाणीच नाही तर चहासुद्धा दिला होता याचा व्हिडिओ आज ट्विटद्वारे प्रसारित केला आहे. संजय पांडे यांच्या या ट्विटमुळे नवनीत राणा यांचा कांगावा उघड पडला आहे, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससुद्धा तोंडघशी पडले आहेत.
...मग त्यांना चहा का पाजला - नवनीत राणा आणि रवी राणा हे जर आरोपी होते तर पोलिसांनी त्यांना चहा का पाजला? असा उलटा सवाल आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आरोपींना पोलिसांनी चहा का पाजला असा सवाल करत राणा यांचा कांगावा झाकण्याचा प्रयत्न दरेकर यांनी केला आहे.
ही केवळ नौटंकी - नवनीत राणा आणि रवी राणा यांची केवळ नौटंकी सुरू असून, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार पोलिसांनी केलेला नाही. हे कुटुंबच कांगावाखोर असून, ते कशा पद्धतीने वागतात हे आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.