ETV Bharat / city

महाराष्ट्रातील नेत्यांची 'राम' भक्ती.. हिंदुत्वासाठी सर्वपक्षीयांची अयोध्या वारी - उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत.

raj thackeray visit ayodhya
raj thackeray visit ayodhya
author img

By

Published : Jan 30, 2021, 10:33 PM IST

मुंबई - देशात बहुसंख्यांकांची व्होट बँक कॅश करण्यासाठी राम व अयोध्येत निर्माण होणार भव्य राममंदिर राजकारण्यांसाठी रामबाण उपाय ठरत आहे. तीन दशकांपूर्वी राम ही फक्त भाजपची मक्तेदारी होती मात्र आता काही सेक्युलर पक्ष सोडून सर्व छोट्या-मोठ्या प्रादेशिक पक्षांसाठीही राम निवडणुकीत तारणहार ठरत आहे. त्यामुळेच अनेक नेत्यांची आयोध्या वारी सुरू झाली आहे. काँग्रेसने राम मंदिरासाठी काही पुढाकार घेतला नसला तरी त्यांनी राममंदिराबाबत भाष्य करणे टाळले आहे.

भाजपच्या सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नेत्यांसाठी राम व आयोध्या चलणी नाणे आहे. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपेत्तर पक्षांचे नेतेही आयोध्या वारीसाठी उत्सूक आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर येत्या मार्च महिन्यात राज ठाकरे अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

राज ठाकरे करणार अयोद्धा दौरा -

दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आणखी पुढचं पाऊल टाकणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसेप्रमुखराज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. मनसेच्या या बैठकीनंतर राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली. येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं सांगितले जात आहे.

राज यांचा दौरा यशस्वी होऊ दे - नारायण राणे

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी होवो हीच शुभेच्छा. एखाद्या नेत्याला वाटलं जावं दर्शन करावं, तर यावर काय बोलणार. पण शुभेच्छा..त्यांचा दौरा यशस्वी होऊ दे, असं नारायण राणे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वेळा केली आयोध्या वारी -

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ७ मार्च २०२० रोजी आयोध्या दौरा केला होता. भाजप व रालोआतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रामाच्या नगरीत दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मि ठाकरे व मुलगा व आदित्य ठाकरेही होते. ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री व पक्षाचे पदाधिकारीही आयोध्येला आले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे मंत्री नितीन राऊतही आयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांच्याआधी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आयोध्येला पोहोचले होते.

उद्धव ठाकरेंनी एकदा टाळला होता अयोध्या दौरा -

त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी 24 नोव्हेंबर 2019 रोजी पूर्वनियोजित आयोध्या दौरा टाळला होता. त्याआधी उद्धव ठाकरे जून 2019 मध्ये पक्षाचे नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन अयोध्येला गेले होते व रामलल्ला मंदिरात पूजा केली होती.

देवेंद्र फडणवीसही घेणार राम लल्लाचे दर्शन -

राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार आहे, असं माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एक लाख रुपयांचा चेक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला.

राममंदिरासाठी 12 कोटी कुटुंबांशी संपर्क -

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. या अभियानाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून 15 जानेवारीला सुरुवात झाली. हे देशव्यापी अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून तब्बल 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये, अशा स्वरुपात निधी संकलित केला जात आहे. निधी दिल्यानंतर, संबंधित व्यक्तीला पावती तसेच मंदिर आणि श्रीरामांचे एक चित्र देण्यात येते.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांची आयोध्या वारी -

काँग्रेस नेते संजय निरुपम आणि फिल्म निर्माता संदीप सिंह सोबत प्रख्यात गायक सोनू निगम यांनी रविवारी (२४ जानेवारी) अयोध्येत रामलल्ला व बजरंगबलीते दर्शन घेतले. निरुपम राम जन्मभूमीत विराजमान रामलल्लाच्या आरतीत सामील झाले.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची मंदिरासाठी देणगी -

काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी एक लाख अकरा हजार अकराशे अकरा रुपये देणगी दिली आहे. दिग्विजय सिंहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून श्री राम जन्मभूमी ट्रस्टला चेक पाठवला आहे. चेकसोबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आवाहन केलंय की, देणगी गोळा करण्याचे काम सौहार्दपूर्ण वातावरणात व्हायला हवं. त्यांची असंही म्हटलं की विश्व हिंदू परिषदेने याआधी झालेल्या देणगीचा लेखा-जोखा जनतेसमोर ठेवायला हवा.

सिंधी बांधवांकडून २११ किलो चांदीच्या विटा -

अयोध्या राम मंदिराच्या उभारण्यासाठी सिंधी बांधवाकडून २११ कि.लो. चांदीच्या विटा रामजन्म भूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे सोपविण्यात आल्या.

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून १० लाखांची देणगी -

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दहा लाख रुपयांची देणगी २३ जानेवारी रोजी दिली. मावळातील प्रत्येकाने या अभियानात सहभागी होऊन राममंदिर निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शेळके यांनी मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मावळवासियांना केले आहे.

वर्गणीवरून शिवसेनेचा सवाल -

अयोध्येतील राम मंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरु झाले. 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असे विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितले. आता या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे?” असे सवाल शिवसेनेने विचारले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.