नागपूर - कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा (Omicron Variant) प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे (First to Seven Standard) वर्ग सुरु करण्यास पुन्हा १५ डिसेंबर, २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी (१० डिसेंबर) रोजी जारी केले आहेत.
सध्या कोरोना विषाणुचा नवा प्रकार "ओमायक्रॉन" आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटनेने सदर विषाणू प्रकारास व्हेरीयंट ऑफ कंर्सन म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील शाळा सुरू करण्याचे आदेश १५ डिसेंबर नंतर जारी करण्यात येतील. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - Mumbai Mayor Death Threats : मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी