ETV Bharat / city

मोहम्मद रफी यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, रामदास आठवले यांची मागणी

लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न 'किताब मिळण्यासाठीची शिफारस महाराष्ट्र् राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Mohammad Rafi
मोहम्मद रफी
author img

By

Published : Aug 1, 2020, 8:42 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा मरणोत्तर भारतरत्न किताबाने गौरव करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठवले यांनी पाठविले आहे.

लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न 'किताब मिळण्यासाठीची शिफारस महाराष्ट्र् राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून पद्मश्री मोहम्मद रफी यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. मोहम्मद रफी यांनी अजरामर गीते गाऊन जनमानसाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे.

मोहम्मद रफी यांचा नुकताच 31 जुलै रोजी 40 वा स्मृतिदिन संपन्न झाला. त्यानिमित्त रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि कपिल कला केंद्रचे कपिल खरवार यांनी आठवले यांची भेट घेऊन मोहम्मद रफी यांना भारतरत्न 'किताब द्यावा या मागणीचे निवेदन दिले. यावेळी मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.