मुंबई - उद्धव ठाकरे गटाने नवीन चिन्हासह नवीन पक्षाचे नाव असलेले पोस्टर जारी केले. उद्धव ठाकरे गटाला, ( Shivsena Thackeray group ) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच निशाणी म्हणून मशाल देण्यात आली ( ECE allotted new symbol to Shivsena ) आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ( Eknath Shinde ) बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - नवीन चिन्ह, नवे नाव 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray )' - आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खूप अभिमान ( Aaditya Thackeray reaction ) आहे. महाराष्ट्रातील हजारो लोकांचे प्राण वाचवून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. आम्ही लोकांसाठी काम करणारे सत्यनिष्ठ प्रामाणिक आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
याबाबत निवडणूक आयोगाने विधसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाला शिवसेना बाळासाहेब उद्धव नाव मिळाले आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेब शिवसेना नाव निवडणुक आयोगाने जाहीर केले आहे. तर, ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून शिंदे गटाला तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ( Andheri East Assembly Elections ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता, आतापर्यंत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष ( Thackeray vs BJP ) पाहायला मिळाल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट ( Thackeray vs Shinde group ) असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता, ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर शिंदे गट देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती.