ETV Bharat / city

कोरोनामुक्त झाल्यावर पुन्हा लागण, गोरेगावच्या नेस्को कोव्हीड सेंटरमध्ये पोस्ट ओपीडी सुरू

कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने केईएम, नायर रुग्णालयानंतर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पोस्ट ओपीडी सुरू केली आहे.

BMC
महापालिका
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:48 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना पालिकेचा आरोग्य विभाग रुग्णांना बरे करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. त्याच दरम्यान कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने केईएम, नायर रुग्णालयानंतर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पोस्ट ओपीडी सुरू केली आहे. या ओपीडीत फुफ्फुसांचा व्यायाम आणि फिजिओथेरपीवर विशेष लक्ष दिले जाईल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

पोस्ट ओपीडी
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोनावर मात केलेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नायर व केईएम रुग्णालयात पोस्ट ओपीडी याआधीच सुरू करण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आता गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये पोस्ट ओपीडी सुरू करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, नेस्कोच्या पोस्ट ओपीडीत फुफ्फुसांचा व्यायाम आणि फिजिओथेरपीवर विशेष लक्ष दिले जाईल. ज्यासाठी, केंद्र आवश्यक उपकरणे खरेदी करण्यात येतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

खाटा रिक्त असल्याने ओपीडी
मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे सुरुवातीला जम्बो कोविड सेंटर मध्ये रुग्णांना दाखल करण्यात येत होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जम्बो कोविड सेंटर मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली. त्यानंतर नेस्को जम्बो कोविड सेंटर मध्ये आवाजी चाचणीचे नमुने घेण्यास सुरुवात केली. आवाजी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी खाटा रिक्त पडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोस्ट ओपीडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ओपीडी तत्त्वावर रूग्णांना तपासण्यासाठी केईएम आणि कूपर रूग्णालयाच्या तज्ञांना बोलवण्याच्या विचारात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोना रुग्णांना पुन्हा लागण
कोरोनातून बरे झालेल्या कोविड -१९ रूग्णांमध्ये दीर्घकाळापर्यंत राहणारी गुंतागुंत तयार झाली आहे. यात श्वास घेताना त्रास होणे, थकवा, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, फुफ्फुसातील फायब्रोसिस, हृदयरोग आणि इतर अवयवांमध्ये सुन्नपणा अशी लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे रुग्णांना उपचार करून घेण्यासाठी खासगी दवाखान्यात हजारो लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार देखील पडतो आहे. त्यासाठी पालिकेने कोव्हीड सेंटरमध्ये ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट; 645 नवे रुग्ण, 19 रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा -केईएम रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.