ETV Bharat / city

Nagar Panchayat Election 2021 : राज्यातील 105 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद,15 पंचायत समित्यांचे आज मतदान - मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा

मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. (Nagar Panchayat Election 2021) उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होतआहे. परंतु, मतमोजणी मात्र, सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मतदान करताना नागरिक (फाईल फोटो)
मतदान करताना नागरिक (फाईल फोटो)
author img

By

Published : Dec 21, 2021, 7:38 AM IST

Updated : Dec 21, 2021, 10:08 AM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. (Nagar Panchayat Election 2021) उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होत आहे. परंतु, मतमोजणी मात्र, सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाचा 6 डिसेंबर 2021 चा आदेश

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 105 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकासाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठेवायाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.

हेही वाचा - Local Body Elections 2021 : आज राज्यभर नगरपंचतसाठी होतय मतदान, विदर्भातील 40 नगरपंचायतींचा समावेश

Last Updated : Dec 21, 2021, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.