ETV Bharat / city

Political Use of Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा राजकीय वापर ; महापालिकेडून वृक्षतोड, राष्ट्रवादी काँग्रेस युवकांचा आंदोलनाचा इशारा - trees cut by Municipal Corporation

मुंबई विद्यापीठाचे कलिना आवारात दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातील मुंबई महानगर प्राधिकरणाच्या मैदानावर जोरात तयारी सुरु आहे. महापालिकेने नियमाचे उल्लंघन करून येथील झाडे तोडली असल्याचा आरोप त्यांनी (trees cut by Municipal Corporation)केला. या कार्यवाहीलाच आक्षेप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अॅड. अमोल मतेले यांनी घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला (warning of NCP Congress Youth to protest) आहे .

Municipal Corporation Violation of environment
मुंबई विद्यापीठाच्या आवारात वृक्षतोड
author img

By

Published : Oct 2, 2022, 11:31 AM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कलिना आवारात दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातील मुंबई महानगर प्राधिकरणाच्या मैदानावर जोरात तयारी सुरु आहे. मेळाव्यासाठी ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहनतळ मुंबई विद्यापीठाच्या आवारात करण्याचे काम सुरू (Municipal Corporation Violation of environment) आहे. याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी हरकत घेतलेली आहे. जर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण आणि महापालिका यांनी हे काम रोखलं नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा अॅड. अमोल मातेले राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते यांनी दिला (NCP protest against Municipal Corporation) आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट - राज्यात शिवसेना मुळ कोणाची, पक्षाचे चिन्ह याच्यावर मालकी कोणाची याबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. रस्त्यावरील संघर्ष सुरू आहे. राजकीय टीका क्षणाक्षणाला जनतेसमोर येत आहे. एकीकडे न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. त्याचा निकाल अजून काही काळाने लागेल. मात्र तोपर्यंत राजकीय वातावरण तापणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाची सभा मुंबईतील मुंबई महानगर प्राधिकरणाच्या मैदानावर नियोजित केलेली आहे. या सभेसाठी दसरा मेळाव्याला राज्यातून लाखो लोक गाड्या भरून येणार आहेत .

प्रतिक्रिया देताना अॅड. अमोल मातेले राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते

कार्यवाहीला आक्षेप आंदोलनाचा इशारा - राज्यातील 31 जिल्ह्यांमधून बस ,लक्झरी चार चाकी वाहने येण्याची शक्यता आहे. म्हणून विद्यापीठाच्या आवारातील मोकळे मैदान वाहनतळ म्हणून वापरावे यासाठी कार्यवाही सुरू आहे. महापालिकेने नियमाचे उल्लंघन करून येथील झाडे तोडली असल्याचा आरोप त्यांनी (trees cut by Municipal Corporation) केला. या कार्यवाहीलाच आक्षेप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अॅड. अमोल मतेले यांनी घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला (warning of NCP Congress Youth to protest) आहे .

विद्यापीठ परिसराचा राजकीय वापर अयोग्य - यासंदर्भात अॅड.अमोल मतोले यांच्याशी ईटीव्ही भारत नाही संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की - कोणीतरी राजकीय गटाच्या कार्यक्रमासाठी अशी वाहनतळ व्यवस्था करणे उचित नाही. तसे केल्यास पुढे मुंबई विद्यापीठातील ही जागा कोणत्याही उथळ कार्यक्रमांना मिळू शकते, तशी परंपराच पडू शकते. त्यामुळे आम्ही ही हरकत (Political Use of Mumbai University) घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.