ETV Bharat / city

Political Crisis in Maharastra : ज्यांना पक्षामुळे सर्वकाही मिळाले, तेच आज गद्दारी करीत आहे : संजय राऊत - Shiv Sena MP Sanjay Raut

सध्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ( Political Crisis in Maharastra ) तापले आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात ( Shiv Sena meeting at Dahisar ) राऊत ( Sanjay Raut ) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ( Guide The Workers ) करताना बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. पाठीत खंजीर खुपसणारे पाठीत शिवसैनिक केव्हाच होऊ शकत नाहीत. तसेच बंडखोर आमदारांना त्यांनी गद्दार ( All Rebels Are Traitors ) असे संबोधले आहे.

Shiv Sena Leader Sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Jun 26, 2022, 8:30 PM IST

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत उभी फूट ( Vertical Split in Shiv Sena ) पडल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे ( Shiv Sena Rebellious MLA ) पक्षाचे मोठे नुकसान ( Great Loss to The Party ) होत आहे. पाठीत खंजीर खुपसणारे शिवसैनिक केव्हाच होऊ शकत नाहीत. ज्यांना पक्षामुळे सर्वकाही मिळाले, तेच आज गद्दारी करीत आहे. खरा शिवसैनिक असे कधीच करू शकणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी बंडखोर आमदारांवर चढवला. तसेच वेळ आली तर बाळासाहेबांचा शिवसैनिक ( Balasaheb Shiv Sainik ) भगवा खिशात आणि दांडा बाहेर काढेल, असा धमकीवजा इशारा दिला. दहिसर ( Shiv Sena meeting at Dahisar ) येथील शिवसेनेच्या मेळाव्यात राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर : नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५२ आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. राज्यभर बंडखोर आमदारांबद्दल तीव्र निदर्शने केली जात आहेत. कुणाची कार्यालये फोडली जात आहेत. राज्यात बंडखोरांच्या विरोधात आता शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहे. त्यांची भूमिका ही पक्षाला शोभणारीच आहे. खऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेब यांची शिकवण आहे. त्यामुळे खांद्यावर असलेला भगवा तो खिशात ठेवून दांडा बाहेर काढेल आणि मग बंडखोरांबाबत काय होऊ शकते याचे संकेतच राऊतांनी दिले. तसेच, आतापर्यंत चर्चेपर्यंत असलेला विषय आता रस्त्यावर उतरण्यापर्यंत येऊन ठेपल्याचे राऊत यांनी सांगितले. एकंदरीत बंडखोरामुळे शिवसैनिकावर आणि पक्षावर काहीही परिणाम होणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

गद्दारांना आता विसर पडला : शिवसेना या चार अक्षरांमुळे ताकद, पैसा सर्वकाही मिळाले आहे. पक्षात येण्यापूर्वी तुम्ही कोण होता? असा प्रश्न उपस्थित करीत एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण सोडले. गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचे. प्रकाश सुर्वे भाजीपाला विकायचे, संदीपान भुमरे साखर कारखान्यात सुरक्षारक्षक होते. त्यांना पक्षाने मोठे केले. शिवसेना पक्षात वैयक्तिक असा कोणीच मोठा नाही. पक्षाने दिलेली ताकद आणि संधी यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज मंत्रीपदावर जाता आले आहे. काहींना त्याचा आता विसर पडला. राऊत यांनी बंडखोर आमदारांसहित भाजपवर जोरदार सडकून टीका केली. शिवसैनिकांनीही जयघोषात राऊत यांच्या भाषणाला दाद दिली.

बाळासाहेबांचे गटाला नाव देणे याची लाज वाटावी : हे असले शिवसैनिक होऊच शकत नाहीत. तसेच एवढे करूनही बाळासाहेबांचे नाव गटाला दिले जात आहे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे, असे संजय राऊत म्हणाले. सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिक यांना कदापि माफ करणार नाही, असे यांनी स्पष्ट केले. दहिसर येथील मेळाव्यात त्यांनी पक्ष आणि शिवसैनिक यांचे नाते यावर भाष्य करताना शिवसेना या चार शब्दांचे महत्त्व विषद केले. पक्षामुळे आज सर्वसामान्य कार्यकर्ता हा आमदार, खासदार झाला आहे. या पक्षामुळे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसैनिकाला दिल्लीतही वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.