मुंबई - दिशा सलियन ( Disha Salian Death Case ) यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Police summonsed to Narayan Rane ) यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, तर भाजपा आमदार नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे.
-
Disha Salian death case | Malvani Police Station summons Union Minister Narayan Rane to record a statement on March 4, 11 am, and BJP MLA Nitesh Rane to appear at 11 am on March 3
— ANI (@ANI) March 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Disha Salian death case | Malvani Police Station summons Union Minister Narayan Rane to record a statement on March 4, 11 am, and BJP MLA Nitesh Rane to appear at 11 am on March 3
— ANI (@ANI) March 2, 2022Disha Salian death case | Malvani Police Station summons Union Minister Narayan Rane to record a statement on March 4, 11 am, and BJP MLA Nitesh Rane to appear at 11 am on March 3
— ANI (@ANI) March 2, 2022
राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल -
दिशा सालियान (Disha Salian case) हीच्या मृत्यूबद्दल खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी (Disha Salian's notoriety )तीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन केंद्रिय लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) आणि भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली, ती गरोदर होती असा नारायण राणेंचा दावा होता. यावरुन ते या प्रकरणात अनेक लोक अडकल्याचा आरोप करत शिवसेनेला टार्गेट करत होते. सालियन कुटुंबियांनी या संदर्भात नुकतीच राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. महिला आयोगाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा अहवालही मागवला होता. त्या अहवालानुसार तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नाही तसेच मृत्यूच्या वेळी ती गरोदर नव्हती असे म्हटलेलं आहे. या पार्श्वभुमीवर सालियन कुटुंबियांनी राणे पिता पुत्रा विरोधात खोटे आरोप करुन आमची बदनामी करत असल्याची तक्रार केली होती.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण देशभर गाजले, त्याच्या आत्महत्येच्या काही दिवसाआधी दिशा सालियान हिचा इमारतीवरुन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या संदर्भात तीची आत्महत्या की खुन असे प्रश्न उपस्थित केले गेले, दिशाच्या आत्महत्येचा तपास सुरु होता. दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहेका हे पण तपासण्यात येत होते. दिशाने आत्महत्या केली नसून तीच्यावर अत्याचार करुन तीला ढकलून मारल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलीस तपासात तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नव्हते, त्यांनी या संदर्भात तसा अहवाल तयार केला आहे.
हेही वाचा - Disha Salian Death Case : सालीयान कुटुंबीय महिला आयोग अध्यक्षांच्या भेटीला