वडाळ्यात पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू; गोंधळ घालणाऱ्या जमावावर 'लाठीचार्ज' - पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू
आज दिवभरात या जमावाने पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको केले. मात्र, संध्याकाळी जमावाने पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पळवून लावले.
मुंबई - वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच पोलीस ठाण्याला मृताच्या नातेवाईकांसह जमावाने घेराव घातला होता. मृताच्या नातेवाईकांची समजूत काढल्यानंतरही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने वडाळा पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज दिवभरात या जमावाने पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको केले. मात्र, संध्याकाळी जमावाने पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पळवून लावले.
याप्नकरणी गरिकांकडून होणाऱ्या संतप्त आंदोलनाला अनुसरून विजय सिंग यांच्या मृत्यू संदर्भात गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात 5 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
- काय आहे प्रकरण
27 ऑक्टोबरला वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत असल्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला होता. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांची बीट मार्शल दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते. यामध्ये विजय सिंग नामक व्यक्तीचा समावेश होता.
या तरुणांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, काही वेळातच विजय सिंग याने छातीत दुखत असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना विजय सिंग याचा मृत्यू झाला. विजय सिंगच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप केला.
या प्रकरणी अधिक तपासासाठी विजय सिंगचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे शहर पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
27 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत असल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल आला होता. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांची बीट मार्शल दाखल झाली असता, पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते ज्यात विजय सिंग याचा सुद्धा समावेश होता . पोलिसांनी पोलिस ठाण्यात या तरुणांना आणल्यानंतर त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र काही वेळातच विजय सिंग याने त्याच्या छातीत दुखत असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना विजय सिंग यांचा मृत्यू झाला.
विजय सिंगच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू हा पोलीस मारहाण झाल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणी अधिक तपासासाठी विजय सिंग याचा मृतदेह जेजे रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मयताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचा मुंबई पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय यांनी म्हटलं आहे.
Conclusion: