मुंबई- दिवंगत अभिनेत्री जिया खानची ( Jia Khans Suicide Case ) आई राबिया खान (Petition of Rabia Khan) हिच्या याचिकेवरील आजची सुनावणी ( Petition to transfer Jia Khans suicide investigation) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court hearing on Jia Khan Suicide case ) पुढे ढकलली. याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, आपल्या देशातील केंद्रीय यंत्रणेला ( Indian Investigation Agency ) कमी लेखले जाऊ नये. या एजन्सी क्लिष्ट प्रकरणे सोडवतात त्यामुळे कमी पडू नये अशी टिप्पणी केली आहे.
जियाच्या मॅसेजची चौकशी करण्याची मागणी - अभिनेत्रीची आई राबिया खान यांचे म्हणणे आहे की, सूरजने जियाला ब्लॅकबेरी मेसेंजरद्वारे संदेश पाठवले आणि नंतर ते हटवले गेले त्याचीही चौकशी झाली पाहिजे. एवढेच नाही तर ज्पया दुपट्ट्याने तिने आत्महत्या केली त्याचीही पुन्हा तपासणी व्हावी असे राबिया खान हिने म्हटले आहे. सीबीआयने चंडिगड सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे दुपट्टा पाठवण्याच्या परवानगीसाठी आणि जप्त केलेले मोबाईल फोन अमेरिकेतील एफबीआयकडे पाठवण्यासाठी परवानगीसाठी डिसेंबर 2019 मध्ये अर्ज दाखल केला होता.
हत्येचा तपास अमेरिकी तपास संस्थेकडे द्यावा - जिया खानच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अमेरिकेतील प्रमुख तपास संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन कडे हस्तांतरित करण्याची जियाच्या आईची याचिकेत मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. सीबीआयनेही जिया आणि आरोपी सूरज पांचोलीचे ब्लॅकबेरी सेलफोन एफबीआयकडे पाठवण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. जेणेकरून तिच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यात झालेले चॅट मिळू शकतील, असे जियाच्या आईने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण? - अभिनेत्री जिया खान हिचे निधन झाले तेव्हा ती अवघी 25 वर्षांची होती. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले होता. 10 जून 2013 रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत खटला सुरू आहे.
हेही वाचा - Chawl culture : मुंबईची ओळख जपणारी चाळ संस्कृती, सुमारे 20 हजार चाळी पुनर्विकासाच्या कचाट्यात