ETV Bharat / city

Ajit Pawar : 'कोणी, कोणाच्या, कोठे दगड आणि धोंडा ठेवला, हे अधिवेशनात सांगणार' - अजित पवार चंद्रकांत पाटील

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावा लागलं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होते. त्यावर कोणी, कोणाच्या, कोठे दगड आणि धोंडा ठेवला आहे, हे नक्की सांगेन, असा चिमटा अजित पवारांनी काढला ( ajit pawar taunt chandrakant patil ) आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Jul 25, 2022, 8:16 PM IST

मुंबई - 'मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावा लागलं', असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी केलं होते. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना मातृशोक झाला असून, त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विधानसभेमध्ये 'कोणी, कोणाच्या, कोठे दगड आणि धोंडा ठेवला आहे, हे नक्की सांगेन', असा चिमटा अजित पवारांनी काढला ( ajit pawar taunt chandrakant patil ) आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

महाराजांची प्रतिमा असलेली वाहन अडवतात? - तिरुपती देवस्थान संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यावेळी मध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांच्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असली असती हटवली जाते असा या व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे तिरुपती देवस्थानचे ट्रस्टी आहेत. त्याप्रकरणी एक ते दोन दिवसांमध्ये बोलून याबाबतचे गैरसमज दूर केले जातील. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून काही गैरसमज दूर असतील, तर ते दूर करावे, असे देखील अजित पवारांनी सूचित केलं आहे.

'अतिवृष्टी ठिकाणी पाहणी दौरा करणार' - अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, यामुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यासाठी राज्य सरकारने तत्परतेने मदत करणे आवश्यक आहे. लवकरच आपण अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करणार आहे. पालकमंत्री नसल्याने अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच, स्थानिक प्रतिनिधींनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणांची पाहणी केल्यास अधिवेशनातही राज्यातील परिस्थितीचा आढावा घेता येतो. मात्र, या अधिवेशनात पुढे ढकलत असल्याने राज्य सरकारवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलायचे असतील तर...' - सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली. यासोबतच सहकार क्षेत्रातील निवडणुका देखील नवीन राज्य सरकारने पुढे ढकलल्या. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तर केवळ चार प्रतिनिधींची निवडणूक होती. मात्र, तीही राज्य सरकारने जाणून-बुजून पुढे ढकलल्या. निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या संस्थांच्या प्रक्रिया पुढे सुरु ठेवा, ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियाच सुरु झाली नसेल. त्या ठिकाणच्या निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलायचे असतील, तर त्यांना काही हरकत नाही, असेही अजित पवारांनी सांगितलं.

'छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी...' - अनेक महत्त्वाचे निर्णय नवीन राज्य सरकारने पुढे ढकलले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी दिलेला निधी देखील राज्य सरकारने रोखला. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने 265 कोटी रुपयांचा निधी संमत केला होता. मात्र, तो निर्णयही रद्द करण्यात आला आहे. अष्टविनायक क्षेत्राबाबत घेतलेला निर्णयही नव्या सरकारने रोखला आहे, अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.

'सर्वांच्या सहकार्यामुळे ओबीसी आरक्षण' - ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं. सरकारमध्ये असताना आम्ही ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक होतो. सर्वांच्या प्रयत्नामुळे ओबीसी आरक्षण मिळाला आहे. मात्र, काही राजकीय नेते ओबीसी आरक्षण आपल्यामुळे मिळालं हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्याने ओबीसी आरक्षण मिळवून दिली. त्यावेळी महाराष्ट्रातून मध्यप्रदेश मध्ये टीम पाठवून त्या आरक्षणाचा अभ्यास केला गेला. त्यानंतर तो प्रश्न मार्गी लावण्यात आला.

'पावसाचा अंदाज सांगितल्यास पाऊस पडतच नाही' - अजित पवार यांनी हवामान विभागाला देखील चांगलेच धारेवर धरले. हवामान विभागाच्या अंदाजामुळे शाळेला चार चार दिवस सुट्टी दिली जाते. पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून दिला जातो. त्यानंतर जिल्हाधिकारी सुरक्षेखातीर शाळेला सुट्टी देतात. मात्र, हवामान विभागाने पावसाचा अंदाज सांगितल्यास पाऊस पडतच नाही, असा चिमटा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून काढाला. तसेच, परदेशात हवामान विभाग अगदी अचूक अंदाज सांगतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे ही हवामान विभागाने अचूक अंदाज सांगावे. यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी खर्च करून हवामान विभागासाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायला हवा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांकडून विकास कामांना स्थगिती, अजित पवार संतापले; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.