ETV Bharat / city

CM Eknath Shinde :...मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागच्या रांगेत का?; विरोधकांचा सवाल - मुख्यमंत्री शिंदेंना शेवटच्या रांगेत उभे केल्याने रोहित पवारांची टीका

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( Eknath Shinde Chief Minister ) पदावर विराजमान झाल्यानंतर दिल्लीला जवळजवळ महिनाभरात सहा ते सात वेळा जाऊन आले. नुकतेच नीती आयोगाच्या बैठकीसाठी ( Niti Aayog meeting ) विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्र शासनाने आमंत्रित केले होते. मात्र या बैठकीच्या संदर्भात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आले, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभे केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान खाली गेली आहे, अशी खंत विरोधकांनी व्यक्त केली आहे.

CM Eknath shinde
CM Eknath shinde
author img

By

Published : Aug 7, 2022, 7:52 PM IST

Updated : Aug 7, 2022, 8:08 PM IST

मुंबई - राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला घालवून शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालेला आहे. 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर अवघ्या देशाने आणि राज्याने गुवाहटी अहमदाबाद आणि गोवा असा बंडखोर आमदारांचा मुक्काम राहिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( Eknath Shinde Chief Minister ) पदावर विराजमान झाल्यानंतर दिल्लीला जवळजवळ महिनाभरात सहा ते सात वेळा जाऊन आले. नुकतेच नीती आयोगाच्या बैठकीसाठी ( Niti Aayog meeting ) विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्र शासनाने आमंत्रित केले होते. मात्र या बैठकीच्या संदर्भात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आले, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभे केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. त्याचे आपल्याला दुःख झाल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे.

'मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे' : नीती आयोगाची अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात झाली. जी-२० नवीन शिक्षण धोरण, शालेय शिक्षण, आत्मनिर्नभर भारत अशा अनेक विषयांवर यामध्ये चर्चा केली गेली. मात्र त्यात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना एकदम शेवटच्या रांगेत उभे केले गेल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे. या संदर्भात रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, काहीही झाले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्ब्ल बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात आणि अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत. याची दखल केंद्र शासन, पंतप्रधान मोदी त्यांनी घ्यायला हवी होती. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत असे स्थान देणे हे मराठी माणसाला राज्यातील प्रत्येक मराठी माणसाला देखील दुःख होण्यासारखेच आहे. म्हणून मला इथे दुःख झाला आहे आणि केंद्रशासन या संदर्भात यापुढे याबद्दलची दक्षता घेईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

  • एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नीती आयोगच्या बैठकीत विविध राज्याचे मुख्यमंत्री हजर : निती आयोगाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नीती आयोगाच्या शासकीय परिषदेमध्ये देशाच्या विकासासंदर्भात राष्ट्रीय शिक्षण धोरण शालेय शिक्षण, उच्च शिक्षण तसेच आत्मनिर्भर भारत या संदर्भात देखील विचार केला गेला. नीती अयोगाची ही अनुक्रमे सातवी बैठक होती. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रच्या सभागृहातच ही बैठक झाली. या बैठकीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होते. निती आयोगाच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारने कोणकोणत्या विषयावर लक्ष द्यावे या संदर्भात सूचना देखील केल्या. कोविड संकटातून भारत कसा उभा राहिला, अनेक देश याबाबत प्रारूप म्हणून भारताकडे कसे बघत आहे आणि भारताला अजून मजबुतीची कशी आवश्यकता आहे. या संदर्भातल्या सूचना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत केल्या आहेत.

हेही वाचा - CM Eknath Shinde : कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करणार; मुख्यमंत्री शिंदेंची नीती आयोगाच्या बैठकीत घोषणा

Last Updated : Aug 7, 2022, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.