मुंबई- राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांवर हल्ले झाल्याच्या घनटा नुकत्याच समोर आल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना एक पक्ष लिहले आहे. औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होईल. त्यामुळे या गंभीर मुद्द्याकडे लक्ष घालून त्वरित कारवाई करावी, असे विनंती पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
गेले काही दिवस औरंगाबाद मधील उद्योजकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. हे हल्ले जर रोखले गेले नाहीत तर, महाराष्ट्राबाहेर याच विपरीत चित्र निर्माण होईल. राज्यात निर्माण होत असलेल्या रोजगारावर गदा येईल. त्यामुळे यासंबंधी तातडीने पावले उचलून कारवाई करावी, अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 8 ऑगस्टला भोगले उद्योग समूहाचे संचालक नित्यानंद भोगले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात दिला आहे.
15 ते 20 गुंडांनी बाहेरून येऊन या भोगले समूहातील काही व्यवस्थापकांना मारहाण केली. या मारहाणीनंतर काहींना अटक झाली, तर काही अद्यापही फरार आहेत. तर 10 ऑगस्टला वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये श्री गणेश कोटिंग समूहावर देखील अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळावे यासाठी काही लोक या समूहाकडे गेली होती. अशा दोन घटनांचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रातून केला आहे. गेल्या आठ-दहा महिन्यात अशा तक्रारींची सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार झाल्यास सामान्य कलमांद्वारे कारवाई होते असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा -सेलुतील उद्योजक करवांचा खूनच; लाच प्रकरणातून झाला उलगडा, 5 जण अटकेत