मुंबई - (विरार) - विरार पश्चिमेच्या पुरापाडा चाळपेठ नाक्यावर पाण्याचा फुगा फेकल्याने झालेल्या अपघातात एका सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रामचंद्र हरिनाथ पटेल (५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Holi Celebration In Virar) विरार पश्चिमेच्या पुरा पाडा रस्त्यावर पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
त्यांचा जागीच मृत्यू झाला
रामचंद्र हे आपल्या सायकल वरून पुरापाडा येथून विरार दिशेने जात होते. याच दरम्यान होळी घेऊन जाणारा एक ट्रक या रस्त्यावरून जात होता. या ट्रकमधील काही तरुणांनी पाण्याने भरलेले फुगे एका भर वेगात येणाऱ्या बाईक स्वाराला मारला. या फुग्याने काही क्षणातच बाईक स्वाराचे नियंत्रण सुटले व त्याची धडक सायकलवरून चाललेल्या रामचंद यांना बसली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बाईक स्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले
बाईकची ही धडक इतकी भीषण होती की त्यात सायकलवर स्वार असलेल्या रामचंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी बाईक स्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दुचाकीस्वार तरुण हे अर्नाळा किल्लात राहणारे आहेत.
हेही वाचा - Happy Holi 2022 : रंगात न्हाऊन निघाव फक्त रंगाचा बेरंग नको; ऐका ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट