मुंबई - अनेक वर्षानंतर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. आयसीसीच्या स्पर्धा वगळता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होत नाही. विश्वचषकाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान संघ आज आमने सामने उतरणार आहे. व्यावसायिकांनीही या सामन्याच्या निमित्ताने वेगवेगळे ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. चेंबूर येथील एका ज्यूस विक्रेत्यांनी एक ज्यूसवर एक जूस मोफत अशी ऑफर ठेवली आहे.
भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने ज्यूसवर एक ज्यूस फ्री आज क्रिकेट विश्वातील सर्वात महत्वाचा म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T 20 विश्वकप स्पर्धा सुरू झाली आहे. भारताचा परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत सामना होत आहे. भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. आज या सामन्यासाठी काही व्यवसायिक क्रिकेट प्रेमींनी विशेष सवलत दिली आहे. चेंबूरच्या ज्यूसमंत्र या व्यावसायिकाने 1 ज्यूसवर 1 मोफत जूस ठेवला आहे. क्रिकेट प्रेमी असलेले बबलू सिंह यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. या सामन्यातून स्वतः आनंद घेऊन दुसऱ्यांना आनंद द्यायचा म्हणून ही सवलत दिल्याचे बबलू सिंह यांनी सांगितले.
भारतानेच जिंकले सर्व सामने वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड खूपच चांगला राहिला आहे. T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने हे सर्व सामने जिंकले आहेत. पाकिस्तानची झोळी आत्तापर्यंत रिकामीच आहे. अशा परिस्थितीत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ भारताविरुद्ध जिंकण्याची संधी शोधत आहे. अशा परिस्थितीत भारताचे अनेक खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानच्या विजयाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरून आरोप