ETV Bharat / city

मुंबईत लोकल प्रवासी संख्या पाहिल्याचं दिवशी दुप्पट, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा - Mumbai Local update

सर्वसामान्य प्रवाशांसाठी मर्यादित वेळेसाठी लोकल सेवा आजपासून सुरू करण्यात आली.

लोकल
लोकल
author img

By

Published : Feb 1, 2021, 7:53 PM IST

मुंबई - सर्वसामान्य प्रवाशांसाठी मर्यादित वेळेसाठी लोकल सेवा आजपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रवासी संख्या दुप्पट झालेली आहे. 25 जानेवारीला मध्य आणि पश्चिम रेल्वेची प्रवासी संख्या 21 लाख होती. ती सोमवारी 40 लाखाचा घरात जाण्याचा मार्गावर आहे.

डॉ. ए.के. सिंग,

लोकल फेऱ्यांची संख्येत वाढ -

कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असलेल्या लाेकलची दारे वेळेचे बंधन घालत अखेर १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी उघडली आहेत. सर्व प्रवाशांसाठी लाेकल सुरू करताना गर्दी होणार नाही व साेशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ही घाेषणा केली होती. त्यामुळे रेल्वेने सुध्दा लोकलच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. तसेच कोरोनाकाळात बंद केलेली रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार, जिने, सरकते जिने खुली करण्यात आलेली आहे.

तिकीट खिडक्यांवर गर्दी -

सर्व सामान्य प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी गर्दी होणार नाही. त्याकरिता सर्वच तिकीट खिडक्या सुरू केल्या आहे. मात्र पहिल्याचं दिवशी रेल्वेने केलेल्या नियोजनाचा पुर्णतः फज्जा उडाल्याचे काहीसे चित्र दिसून आले. बऱ्याच रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर तिकिट काढण्यासाठी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. तर मोठ्या प्रमाणात तिकीट खिडक्यांवर मासिक पासेसचे नूतनीकरण प्रवाशांकडून करण्यात आले आहे.

लोकलची प्रवासी संख्या 40 लाखावर?-

गेल्या महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल सेवेतून प्रवास करण्याची संख्या 21 लाख 50 हजार इतकी होती. ज्यात मध्य रेल्वे मार्गावर 9 लाख तर पश्चिम रेल्वे मार्गवर 11 लाख 50 हजार प्रवासी संख्या होती. मात्र सर्व सामान्य प्रवाशांना सोमवारपासून ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा दिल्यामुळे सोमवारी प्रवासी संख्या दुप्पट होण्याचा मार्गावर आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग यांनी दिली आहेत.

350 प्रवाशांवर कारवाई-

विनामास्क लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे आणि बीएमसीकडून कारवाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे लोकल प्रवासात मास्क परिधान करून प्रवास करणे अनिवार्य आहे. मात्र सोमावरी अनेकांनी मास्क न घालता प्रवास केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजेवपर्यत मध्य रेल्वे मार्गावर 200 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 150 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहेत, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत ही संख्या वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा- अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.