ETV Bharat / city

सोमय्यांना नोटीस, नील सोमय्यांचा जामीन फेटाळला, विरोधकांकडून समाचार.. काय घडलं दिवसभरात?

भाजप नेते किरीट सोमय्या अडचणीत आले ( Kirit Somaiya In Trouble ) असून, त्यांना आयएनएस विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणी ( INS Vikrant Fund Fraud Case ) आर्थिक गुन्हे शाखेने ( Mumbai Police Economic Offences Wing ) पुन्हा नोटीस बजावली ( Police Summonsed to Somaiya )आहे. तर दुसरीकडे नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला ( Nil Somaiya Pre Arrest Bail Rejected ) आहे. यावरून आता सोमय्या यांचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या
author img

By

Published : Apr 12, 2022, 9:07 PM IST

मुंबई - आयएनएस विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणी ( INS Vikrant Fund Fraud Case ) भाजप नेते किरीट सोमय्या अडचणीत आले ( Kirit Somaiya In Trouble ) आहेत. किरीट यांच्यानंतर त्यांचे पुत्र नील यांचा जामीन आज सत्र न्यायालयाने फेटाळून ( Nil Somaiya Pre Arrest Bail Rejected ) लावला. तर दुसरीकडे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ( Mumbai Police Economic Offences Wing ) सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली ( Police Summonsed to Somaiya ) आहे. चौकशीला हजर न झाल्यास सोमय्या यांच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया करून वॉरंट जारी करण्यात येणार आहे. याच प्रकरणावरून आता विरोधकांनी सोमय्या यांच्यासह माजावर जोरदार निशाणा साधला आहे.

उच्च न्यायालयात धाव : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली आहे. युद्धनौका आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणातील अटक टाळण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ( Bjp Leader Kirit Somaiya ) मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने सोमवारी (दि. 11) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनाणी घ्यावी, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने बजावली नोटीस - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने किरीट सोमय्या यांच्या घरी धडक दिली. सोमय्या यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटिशीत किरीट आणि नील सोमय्या यांना बुधवारी (दि. 13 एप्रिल ) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

अन्यथा वॉरंट जारी करणार - किरीट सोमय्या यांना यापूर्वीही चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून हजर राहण्यास सांगितले होते. पण, ते आले नव्हते. त्यामुळे त्यांना स्मरण देणारी ही नोटीस त्यांच्या घरावर लावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस लावली आहे. सोमय्या आणि त्यांचा मुलगा घरी नाहीत. उद्या (बुधवारी) दोघे चौकशीसाठी हजर न राहिल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल. सोमय्या पिता-पुत्रांविरोधात वॉरंट जारी केले जाईल. दोघांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने तीन पथके तयार केली आहेत. त्यामुळे आता सोमय्या या नोटिशीला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत म्हणाले : आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी पैसे गोळा केले. त्यामुळे आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांनी पळून न जाता चौकशीला सामोरे जावे. त्यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाने परदेशातूनही पैसे गोळा केले आहेत. त्याबाबतचा खुलासा आपण लवकरच करणार असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सोमय्यांनी पैसे गोळा केले. त्या पैशांचे पुढे काय झाले ? हा आता पोलीस तपासाचा भाग आहे. भाजप ज्या प्रकारे राजकीय सूड भावनेने तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर आरोप करते, तसे आरोप आम्ही करत नाही. राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करणे असे आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही कमरेखालचे राजकारण कधीही केले नाहीत, करणार नाही. हे आरोप देखील आम्ही राजकीय सूड भावनेने केलेले नसल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. माफियांच्या टोळीने तपास यंत्रणांना हाताशी धरून काही उद्योजकांना, काही लोकांना धमक्या दिल्या. तुम्हाला जेल मध्ये टाकू ईडी आणि सीबीआयची चौकशी लावू अशा धमक्या दिल्या. त्यानंतर त्यांच्याकडून खंडण्या गोळा केल्याचा आरोपही राऊत यांनी सोमय्यांवर केला. हे सर्व पैसे, सर्व व्यवहार थायलंडमध्ये झाला. हे सर्व पैसे बँक ऑफ थायलंडमध्ये जमा केले जात असल्याचा आरोपही राऊतांनी केला. हे प्रकरणही लवकरच बाहेर येईल. सत्य जनतेला कळेलच असा इशाराही राऊत यांनी यावेळी सोमय्यांना दिला आहे.

काँग्रेसची भूमिका : अपहार करायचे आणि पळून जायचे अशी मोठी परंपरा आहे. त्याच्यामध्ये नीरव मोदी पासून ते किरीट सोमय्यापर्यंत नावे घेता येतील. देशाच्या सैनिकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार असून सोमय्या यांनी हजर व्हावे. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांच्याबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांबाबत त्यांची चौकशी सुरू असताना भाजपाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांवर दबाव टाकण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असला तरी पोलिस योग्य ती चौकशी करतील आणि गुन्हेगारांना नक्की शिक्षा होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

कमळाचं चिखल गेलं कुठे ? : दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे केल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आयएनएस विक्रांत प्रकरणी चांगलेच अडकले आहेत. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते संपर्काच्या बाहेर आहेत. यावरून 'कमळाच हे चिखल गेले कुठे'?, असा थेट सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपा आणि सोमय्या यांना विचारला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.