मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांची वीज जोडणी कापण्यात येत असून शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपांना वीज देण्यासाठी वीज जोडणी पूर्ववत करावी. वीज जोडण्या तोडल्या जाऊ नयेत, अशी मागणी आमदार बालाजी कल्याणकर आणि महेश शिंदे यांनी विधिमंडळाच्या सभागृहात केली होती. ही मागणी विरोधी पक्षाने उचलून धरली. विरोधी पक्षाने वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. अखेरीस राज्य सरकारच्यावतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या वीज कापण्यात येणार नाहीत ( Energy Minister Nitin Raut On Farmer Power Cut ) अशी घोषणा केली. ( Nitin Raut announcement in Assembly)
सभागृह चार वेळा तहकूब -
विरोधी पक्षाने केलेल्या जोरदार मागणीमुळे एक वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले. एक वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा विजेच्या मागणीवरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
शेतकऱ्यांची वीज कापणार नाही - राऊत
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले, की कृषी पंप ग्राहकांकडे 44 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांनी भरावी. यासाठी शेतकऱ्यांना वारंवार विनंती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना व्याज आणि दंड माफ करून न हफ्तामध्ये वीज बील भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्याज आणि दंड माफ केल्यानंतर ही रक्कम तीस हजार चारशे कोटी इतकी झाली आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांकडून वीज भरणा होत नाही. शेतकऱ्यांनी टेबल 2378 कोटी रुपये भरणा केला आहे. महावितरण व बँकांचे 47 हजार कोटी रुपयांची गरज आहे. महावितरण अडचणीत असल्याने आता राज्य सरकारच्या वतीने आठ हजार 500 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचे हित आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेता आगामी तीन महिन्यांसाठी शेतकर्यांची वीज जोडणी कापण्यात येणार नाही, तसेच ज्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सभागृहात केली.
हेही वाचा - Devendra Fadnavs : ठाकरे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?- देवेंद्र फडणवीस