ETV Bharat / city

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; मुदतीनंतर परीक्षा अर्ज भरल्यास आता विलंब शुल्क लागणार नाही - दहावी परीक्षा अर्ज विलंब शुल्क

इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या ( 10 and 12 th exam form submission ) विद्यार्थ्यांना मुदतीनंतर परीक्षा अर्ज भरल्यास विलंब शुल्क भरावा लागत होता. मात्र, सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister varsha gaikwad ) यांनी ‍दिली.

varsha gaikwad on late fee
मंत्री वर्षा गायकवाड
author img

By

Published : Dec 23, 2021, 10:48 PM IST

मुंबई - इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या ( 10 and 12 th exam form submission ) विद्यार्थ्यांना मुदतीनंतर परीक्षा अर्ज भरल्यास विलंब शुल्क भरावा लागत होता. मात्र, सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister varsha gaikwad ) यांनी ‍दिली.

हेही वाचा - आम्हाला विचारून रुग्णालयात दाखल केले का? आरोग्य समिती अध्यक्षांनी पालकांना दरडावले

ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा -

राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्चमध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये तांत्रिकदृष्ट्या येत असलेल्या अडचणी पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालक यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना विधान परिषद सदस्य विलास पोतनीस यांनी सभागृहात मांडली. सदस्य अभिजीत वंजारी, अनिल तटकरे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब शुल्क भरावा लागत होता. मात्र, सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. कुठलेही विलंब शुल्क न भरता इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

...यासंदर्भात जाहीर प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे देण्यात येईल

तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत इयत्ता बारावीचे १४ लाख ३१ हजार ६६७ आणि दहावीचे १५ लाख ५६ हजार ८६१ आवेदन पत्रे प्राप्त झाली आहेत. शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल. यासंदर्भात जाहीर प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे देण्यात येईल, अशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा - नवजात बालक मृत्यू प्रकरण - बालकांचा मृत्यू इन्फेक्शनमुळे, पडसादानंतर पालिकेची चौकशी समिती नियुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.