मुंबई - राज्याचे ऊर्जामंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत ( Nitin Raut Removed From SC Department Chairman ) यांना अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. याबाबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून पत्रक जाहीर करण्यात आल असून, त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राजेश लीलोठीया ( Rajesh Lilothiya New SC Department Chairman ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के एस वेणुगोपाल यांनी याबाबत पत्र जारी केले आहे. नितीन राऊत यांच्या बाबतचा हा निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला असल्याची माहिती काँग्रेसकडून मिळत आहे.
काँग्रेस हायकमांडचा निर्णय -
के.एस. वेणुगोपाल यांनी हे पत्रक जाहीर केलं असून, राजेश लीलोठीया यांची अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी तर, तर के. राजू यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती ओबीसी, आदिवासी विभागाच्या कामकाजाची देखरेख करण्यासाठी निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडने नितीन राऊत यांना अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदावरून काढून काँग्रेस हायकमांडने धक्का गेल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याशिवाय काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी आजवर एसीसी विभागासाठी दिलेल्या योगदानाबाबत काँग्रेस पक्षाकडून आभार देखील व्यक्त केले आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar On 31 December Party : ३१ डिसेंबरला पार्टी करताय.. पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार