मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट (coronas second wave status in Maharashtra) तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. असे असले तरी कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कायम आहे. गुरुवारी नवीन 963 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 24 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सोमवारी 686 रुग्ण आढळून आले होते. त्यात बुधवारी वाढ होऊन 1003 रुग्णांची नोंद झाली होती. आज पुन्हा त्यात घट होऊन 963 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 24 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 972 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.65 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा-कोरोना लस घेण्याबद्दल सलमान खानचे जनतेला आवाहन
राज्यात कोरोनाचे 11,732 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 963 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले (new corona patients in Maharashtra) आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 27 हजार 838 वर पोहचला आहे. तर आज 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 692 वर पोहोचला आहे. आज 972 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 71 हजार 763 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.65 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 43 लाख 84 हजार 736 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.29 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 282 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 11 हजार 732 सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा-बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची अवघ्या 14 दिवसांत कोरोनावर मात
रुग्णसंख्येत चढ उतार -
14 ऑक्टोबरला 2384 रुग्ण आढळले होते. 14 नोव्हेंबरला 956 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003, 18 नोव्हेंबरला 963 रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा-कोरोना लसीचा संकोच हाच सर्वात मोठा धोका - अदर पूनावाला
मृत्यू संख्येत चढ-उतार -
तर 28 जुलैला कोरोनाने 286 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. 30 ऑक्टोबरला 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32, 18 नोव्हेंबरला 24 मृत्यूंची (corona deaths in Maharashtra during second wave) नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 226
अहमदनगर - 78
पुणे - 107
पुणे पालिका - 91
पिंपरी चिंचवड पालिका - 50