मुंबई- राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचवेळी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण 'जैसे थे'च आहे. राज्यात आज 63 हजार 309 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे.
राज्यात उपचारादरम्यान 985 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात 24 तासात 61 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन, मोफत लसीकरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 61 हजार 181 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 37 लाख 30 हजार 729 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या 63 हजार 309 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 24 तासांत 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर एकूण 44 लाख 73 हजार 394 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा-रत्नागिरीच्या एमआयडीसीमध्ये स्फोट; फार्मा कंपनीला आग लागल्याची माहिती
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 4926
ठाणे- 991
ठाणे मनपा- 942
नवी मुंबई-717
कल्याण डोंबिवली- 1127
मीराभाईंदर-429
पालघर-826
वसई विरार मनपा-928
रायगड-1102
पनवेल मनपा-606
नाशिक-1526
नाशिक मनपा- 3213
अहमदनगर-2372
अहमदनगर मनपा-582
धुळे- 245
जळगाव- 818
नंदुरबार-974
पुणे- 3430
पुणे मनपा- 4126
पिंपरी चिंचवड- 1916
सोलापूर- 1,653
सोलापूर मनपा-240
सातारा - 1,772
कोल्हापुर-666
कोल्हापूर मनपा-225
सांगली- 1171
सिंधुदुर्ग-135
रत्नागिरी-1053
औरंगाबाद-963
औरंगाबाद मनपा-509
जालना-881
हिंगोली-317
परभणी -744
परभणी मनपा-252
लातूर 898
लातूर मनपा-270
उस्मानाबाद-784
बीड -1,367
नांदेड मनपा-195
नांदेड-451
अकोला मनपा-309
अमरावती मनपा-180
अमरावती 416
यवतमाळ-987
बुलढााणा- 1008
वाशिम - 440
नागपूर- 2566
नागपूर मनपा-5418
वर्धा-1077
भंडारा-1318
गोंदिया-469
चंद्रपुर-893
चंद्रपूर मनपा-454
गडचिरोली-589
हेही वाचा-नागपुरात २५ वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, सहकारी डॉक्टरला बेड्या
5 कोटी 71 लाख व्यक्तींना मोफत लसीकरण-
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख व्यक्तींना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, खासगी रुग्णालयात लसींसाठी पैसे मोजावे लागतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 1 मेपासून लसीकरणाला सुरुवात होणार नाही. तसेच लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.