मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे शहरात गेल्या 24 तासात 47 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 170 झाली आहे. याध्ये शहरातील 38 तर मुंबई बाहेरील 9 रुग्ण आहेत. एका 80 वर्षाच्या वृद्धाचा आज मृत्यू झाल्याने आतापर्यंत मुंबईमधील 6 तर बाहेरील 2 अशा एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 15 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहर परिसरात गेल्या 24 तासांत 206 संशयित रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 61 संशयितांना रुग्णालयात भरती केले आहे.यामधील 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात आज 38 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यामधील 20 जणांच्या टेस्ट पालिकेच्या तर 18 जणांच्या टेस्ट खासगी लॅबमध्ये करण्यात आल्या.
25 जानेवारीपासून 8134 संशयित रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 1829 संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. यामधील 170 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. त्यात मुंबईमधील 126 तर मुंबई बाहेरील 44 रुग्ण आहेत.
एकाचा मृत्यू
एका 80 वर्षाच्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना 27 मार्चला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित रुग्णाला दीर्घकालीन उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होता. त्याचे 28 मार्च रोजी संध्याकाळी निधन झाले. या रुग्णाची कोरोनाबाबातची कोविड– 19 चाचणी 29 मार्चला पॉझिटिव्ह आली होती.
राज्याची आकडेवारी
मुंबई 92
पुणे (शहर व ग्रामीण) 43
सांगली 25
मुंबई वगळून ठाणे व इतर मनपा 23
नागपूर 16
यवतमाळ 4
अहमदनगर 5
सातारा, कोल्हापूर 2
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक प्रत्येकी 1