मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यांत रोज 2 ते 3 हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. बुधवारी 27 ऑक्टोबरला 1485 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यांना 2536 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.53 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यात 1, 485 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 6 हजार 536 वर पोहोचला आहे. तर आज 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 98 वर पोहचला आहे.
हेही वाचा-क्रांती रेडकर यांनी संभाळून बोलावं, हमाम में ... - मंत्री जितेंद्र आव्हाड
19 हजार 480 अॅक्टिव्ह रुग्ण
आज 2536 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 43 हजार 342 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.53 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 22 लाख 2 हजार 811 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.62 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 72 हजार 600 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 19 हजार 480 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा-Breaking News - एनसीबीचा दुसरा पंच शेखर कांबळे कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल
27 ऑक्टोबरला 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 417
अहमदनगर - 131
पुणे - 100
पुणे पालिका - 75
नवी मुंबई पालिका - 68
सोलापूर - 60
सातारा - 65
हेही वाचा-राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली, शर्लिन चोप्राचा आरोप