ETV Bharat / city

अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय देण्याची गरज -तिस्ता सेटलवाड

तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबानच्या दहशतीने तिथले नागरिक देश सोडून इतर देशात आश्रय घेत आहेत. अशा परिस्थितीत भारताने अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय देण्याची नितांत गरज असल्याची, अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

पत्रकार परिषदेत तिस्ता सेटलवाड यांच्यासह सहकारी

author img

By

Published : Aug 23, 2021, 7:53 PM IST

मुंबई - अफगाणिस्तानावर तालिबानची सत्ता आल्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबानच्या दहशतीने तिथले नागरिक देश सोडून इतर देशात आश्रय घेत आहेत. अशा बिकट परिस्थितीच्या वेळी सर्व भारतीयांनी अफगाणिस्तानातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. भारताने अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय देण्याची नितांत गरज असल्याची, अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड पत्रकार परिषदेत बोलताना

'धार्मिक भेदभाव करू नका'

अफगाणिस्तानमध्ये सध्या अत्यंत विदारक आणि अवघ्या मानवतेची हत्या करणारी परिस्थिती उदभवलेली आहे. आधी रशिया आणि नंतर अमेरिकापूर्वी रशिया आणि अलीकडे अमेरिका अशा बलाढ्य राष्ट्रांचा वसाहतवाद आणि तालिबानी मूलतत्ववाद याच्या जीवघेण्या कात्रीत सामान्य अफगाण स्त्री-पुरुष आणि बालके सापडले आहेत. त्यांच्यावर आलेल्या या महाआपत्तीच्या वेळी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. भारताने अफगाणिस्तान सोडू पाहणाऱ्यांना धार्मिक भेदभाव न करता आश्रय दिला पाहिजे असे मत सेटलवाड यांनी व्यक्त केले आहे.

एक लाख निष्पाप नागरिकांच्या मृत्यू-

अमेरिकेतील (9/11)हल्ल्यानंतर अमेरिकाचे सैनिक अफगाणिस्तानातील तालिबांचा खात्मा करण्यासाठी तब्बल 20 वर्ष ठाणे मांडू होते. मात्र, या 20 वर्षांत फक्त अमेरिकेने अफगाणिस्तानातील नागरिकांच्या सुरक्षेचा आव आणला. मात्र, अफगाणिस्तानामध्ये कधीच शिक्षण आणि आरोग्यावर भर न देत मोठ्या प्रमाणात अमेरिकेने शस्त्रसाठ्यावर खर्च केलेला आहे. आज 4 कोटींची लोकसंख्या असलेल्या अफगाणिस्तानात तालिबान आणि अमेरिकेचा सैनिकामधील चकमकीत आजपर्यत एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनाच्या मृत्यू झालेला आहे. आता अमेरिकाने आपले सैन्य मागे घेतले आहे. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानाची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील जनतेला भारताकडून पाठिंबा मिळणे गरजेचे असल्याचे मतही सेटलवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.