ठाणे - कल्याण रेल्वे रुळावरील क्रॉसिंग पॉईंट तुटली ( Railway Crossing Point Broken ) आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊण तास विस्कळीत झाली होती. याचा परिणाम कर्जत, खोपोली व पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूकीवर झाला आहे.
आज ( बुधवारी ) सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास कल्याण रेल्वे रुळावरील क्रॉसिंग पॉईंट अचानक तुटल्याने पुणे मार्ग जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून अर्धा ते पाऊण तासातच ठप्प झालेली रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे. मात्र, या घटनेमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले असून, सर्वच लोकलसह लांब पल्ल्याच्या ट्रेन २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
हेही वाचा - Manisha Kayande On Pravin Darekar : प्रवीण दरेकर फरार आहेत का?, शिवसेनेने विधानपरिषदेत भाजपाला डिवचले