मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदारांना आपल्या मतदारसंघातील कामकाज करताना आणि त्यासाठीचा पाठपुरावा करताना कोणकोणत्या तरतुदी आहेत आणि कोणत्या अडचणी येतात, त्यासाठीचे धडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिले जात आहेत.
हेही वाचा - ...तर कुणी माईचा लाल निवडून येणार नाही - अजित पवार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली आहे. बैठकीमध्ये राष्ट्रपती राजवटीनंतर आमदारांना येणाऱ्या अडचणी आणि त्याविषयीची माहिती दिली आहे. या बैठकीनंतर आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन राज्यात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कामे करण्याचे आदेश पक्षाकडून दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.