मुंबई - आमदार, ( Rebel MLA ) खासदारांनी बंडखोरी ( Rebel MP ) केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) एकाकी पडले आहेत. अडचणीच्या काळात त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ( NCP Leader ), आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) आज शिवबंधन बांधणार आहेत. आज दुपारी १२ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर शिवसेनेला ( Shivsena ) खिंडार पडले आहे. शिवसेना उभी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदार सुषमा अंधारे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. अंधारे यांच्या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार आहे.
राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक- पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त फुले- आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख आहे. या वकील असून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक आहेत. आक्रमक भाषण शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंधारे राष्ट्रवादीत गेले होते. राष्ट्रवादीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ही त्यांनी टीका केली होती.
शिवशक्ती भीमशक्तीचा नारा- शिवसेना कोणाची यावरून सध्या पेच सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढे काय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे असताना अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा घेतला आहे. दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. अंधारेंच्या पक्षप्रवेशामुळे शिवशक्ती भीमशक्तीचा नारा पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे.