ETV Bharat / city

'आम्ही राजकारण करत नाही; आधी आश्वासने थांबवून लस पुरवठा करा' - nawab malik on bharathi pawar

लसीकरणाच्या बाबतीत आम्ही राजकारण करत नाही, सुरुवातीपासून आमची मागणी आहे, केंद्राने मोठे मोठे आकडे समोर ठेऊ नये, जी सत्य परिस्थिती आहेत ती राज्यापुढे ठेवावी. राज्यांना किती लस देणार आहात याची तारखेनुसार आकडेवारी दिली पाहिजे. मात्र, तसे न करता केंद्र सरकारकडून केवळ आश्वासन दिले जात आहे. लस पुरवठा केला जात नाही

आधी आश्वासने थांबवून लस पुरवठा करा
आधी आश्वासने थांबवून लस पुरवठा करा
author img

By

Published : Jul 9, 2021, 12:34 PM IST

मुंबई- दिडोंरी मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांनी मोदींच्या मंत्रिमंडाळात आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर कोरोना आढावा घेत त्यांनी लसीकरणावर राजकारण करू नका, असे आवाहन केले होते. मात्र, राज्यासह देशातील परिस्थिती पाहिली असता, सर्वच लसीकऱण केंद्रावर लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. त्यामुळे केंद्राने आधी सुरुळीत लस पुरवठा करावा असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी लगावला आहे.

आधी आश्वासने थांबवून लस पुरवठा करा

मलिक म्हणाले, लसीकरणाच्या बाबतीत आम्ही राजकारण करत नाही, सुरुवातीपासून आमची मागणी आहे, केंद्राने मोठे मोठे आकडे समोर ठेऊ नये, जी सत्य परिस्थिती आहेत ती राज्यापुढे ठेवावी. राज्यांना किती लस देणार आहात याची तारखेनुसार आकडेवारी दिली पाहिजे. मात्र, तसे न करता केंद्र सरकारकडून केवळ आश्वासन दिले जात आहे. लस पुरवठा केला जात नाही. त्यामुळे आता मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. यासाठी केंद्राने केवळ घोषणा करू नये लस पुरवण्याचे नियोजन करावे, असे आवाहन मलिक यांनी केले.

पंतप्रधानांनी आपल्या पक्षांच्या नेत्यांना आधी आवरावे-

पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी लोकांमध्ये भीती निर्माण न करता जनजागृती करावी. मात्र, पंतपधांनी पहिल्यांदा भाजपाच्या नेत्यांना ताकीद द्यावी. महाराष्ट्रातील भाजप नेते हजारोंच्या संख्यने कार्यकर्त्यांची गर्दी गोळा करून आंदोलन करतात. ज्या ठिकाणी विरोधी पक्षांची सरकारे आहेत तेथील भाजपा नेते नागरिकांना भडकावाले जाते. सरकार कोणता नियम लावत असेल तर गर्दी करत आंदोलन करून सर्व काही सुरु कऱण्याची मागणी केली जाते. मात्र बोलणे आणि करणे यात फरक असल्याचा टोला मलिक यांनी मोदीं यांना लगावला .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.