ETV Bharat / city

'कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कटकारस्थान' - nawab malik on BJP

मेट्रोसारख्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम थांबवण्यासाठी भाजपाचे कटकारस्थान सुरू आहे, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय.

minister nawab malik in mumbai
'कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कटकारस्थान'
author img

By

Published : Nov 3, 2020, 6:20 PM IST

मुंबई - कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाइनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे. मात्र हे काम थांबवण्यासाठी कटकारस्थान सुरू आहे, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

'कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कटकारस्थान'
केंद्राच्या इंडस्ट्री मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे. मेट्रो कारशेडची जागा राज्यसरकारने एमएमआरडीएला वर्ग केली होती. ती मिठागरांसाठी राखीव आहे, अे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच कारशेडला चुकीच्या पद्धतीने जागा देण्यात आल्याचे या पत्रात नमूद आहे. याआधी मिठागराच्या बर्‍याचशा जागा राज्यसरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्या आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.'भाजपाला अडथळा आणायचा आहे'भाजपाचे लोक सुरुवातीला ही खासगी जागा असल्याचे सांगत होते. आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे, असे सांगत आहेत. यावरून भाजपाच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्याचे स्पष्ट दिसते, असे नवाब मलिक म्हणाले.

कांजूरमार्ग कारशेड प्रकरण

आघाडी सरकार सत्तेवर येण्याआधी उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव आरे येथील कारशेड कांजूरमार्गला हलवू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार कारशेड कांजूरला हलवल्यावर सॉईल टेस्टिंगचे काम सुरू झाले असताना केंद्र सरकारने त्या जागेवर दावा केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कारशेडचे काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

33.5 किमीच्या मेट्रो - 3 मार्गासाठी आरे जंगलातील 33 एकर जागेवर कारशेड बांधण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला. त्यानुसार ही जागा मिळवली. त्यावर काम देखील सुरू केले. अगदी काही दिवसांपूर्वी या जागेवर कारशेडचे काम सुरू होते. मात्र यावरून 2014 मध्ये संघर्षाला सुरुवात झाली. पर्यावरण प्रेमी आणि आदिवासीयांनी याला विरोध न्यायालयीन लढाई सुरू केली. ही लढाई सात वर्षे सुरू होती. अखेर त्यांच्या या लढ्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात यश आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.