मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्राबाबत ( Pm Modi Maharashtra Corona spread ) केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन ( Congress Protest Against Gopal Shetty ) केले. यावेळी काँग्रेस नेते भाई जगताप यांनी घराबाहेर 2 तास भाजपा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहे. त्यानंतर पोलिसांनी भाई जगताप आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले ( Mumbai Police Arrest Congress Activist ) आहे.
गोपाळ शेट्टी यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निषेध केला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून सर्व रस्ते अडवले होते. तर गोपाळ शेट्टी यांच्या समर्थनाथ भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते. शेट्टी यांनी बॅनर लावून काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. तर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गोपाळ शेट्टींना पाठिंबा दिला आहे.
याबाबत बोलताना भाई जगताप म्हणाले की, 'पंतप्रधानांना माफी मागावी लागेल, आम्ही गांधी विचाराचे असून, शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. मात्र, गोपाळ शेट्टी यांनी स्वागताचे बॅनर लावून वातावरण तापवले आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत,' असेही यावेळी जगताप यांनी सांगितले.
गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, 'काँग्रेसने माफी मागावी. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे वाईट केले नाही. काँग्रेसने लोकांच्या ठेवी ठेवल्या, कोरोना नियमांचे उल्लंघन केले. मी स्वतः उभा राहून आमच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे स्वागत करीन,' असे शेट्टी म्हणाले.