मुंबई : यावर्षी 2 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमीचा सण (Nag Panchami 2022) साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यातील पंचमी तिथी (Panchami Tithi between Shravan) नागदेवतांच्या पूजेसाठी (worship of nag panchami) अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सनातन धर्मात सापाला पूजनीय मानले जाते. भगवान श्री हरी विष्णू (Lord Shri Hari Vishnu) देखील शेषनागावर (Lord Snake) विराजमान आहेत. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात, शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी महिला नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी सापाला दूध अर्पण केले जाते. या दिवशी महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांची पूजा करतात. सनातन धर्मात नागाला विशेष स्थान आहे. सर्पदेवतांच्या पूजेसाठी काही दिवस अतिशय शुभ मानले जातात; त्यापैकी एक म्हणजे श्रावण महिन्यातील पंचमी तिथी. या दिवशी नाग देवतांची पूजा करणे, अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
नाग पंचमी शुभ मुहूर्त (नाग पंचमी २०२२ शुभ मुहूर्त): 02 अॉगस्ट रोजी, नागपंचमी पूजा मुहूर्त - सकाळी 06:05 ते 08:41 पर्यंत आहे. असा केवळ 02 तास 36 मिनिटांचा कालावधी भाविकांना पुजेसाठी मिळणार आहे. पंचमी तिथी 02 अॉगस्ट रोजी सकाळी 05 वाजुन 13 मिनीटांनी सुरु होणार आहे. तर, पंचमी तिथी समाप्ती 03 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:41 ला होणार आहे.
नागपंचमी पुजेचे योग्य फळ मिळण्याकरीता पुजा करतांना पुढील मंत्र म्हणावा...
सर्वे नागाः प्रीयन्तां मे ये केचित् पृथ्वीतले.
ये च हेलिमरीचिस्था येऽन्तरे दिवि संस्थिताः॥
ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिनः.
ये च वापीतडगेषु तेषु सर्वेषु वै नमः॥
(या जगात स्वर्ग, तलाव, विहिरी, तळी आणि सूर्यकिरणांमध्ये वास्तव्य करणारे सर्प, आम्हांला आशीर्वाद द्या आणि आम्ही सर्व तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो) असा या मंत्राचा अर्थ आहे.
तर,
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्.
शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्.
सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः.
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥
(अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशी नऊ सर्प देवतांची नावे आहेत. जर रोज सकाळी नियमितपणे ह्यांचा जप केला गेला तर सर्पदेव तुम्हाला सर्व पापांपासून सुरक्षित ठेवतील आणि जीवनात विजयी करतील) असा या दुसऱ्या मंत्राचा अर्थ आहे.
नागपंचमीच्या दिवशी या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी :
1. नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा असे मानले जाते. या दिवशी नाग देवतांची पूजा करावी, त्यांना जल अर्पण करावे आणि मंत्रोच्चार करावा.
2. नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरू नये, तसेच लोखंडाच्या भांड्यात अन्न शिजवू नये.
3. कुंडलीत राहू आणि केतू भारी असल्यास, या दिवशी सापांची पूजा करावी. लक्षात ठेवा या दिवशी नागाला दूध अर्पण करताना, पितळेचा कलश वापरावा.
4. नागपंचमीच्या दिवशी जेथे सापांचा बोळ असेल, तेथे जमीन अजिबात खणू नये. तसेच या दिवशी साप मारू नयेत. कुठेही साप दिसला तर जाऊ द्या.
5. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दिवशी आपले शेत नांगरु नये.
हेही वाचा : One village one Ganesha : एक गाव एक गणपती परंपरेने जपले आदर्श, अनेक गावांचा सामाजिक कार्यात सहभाग