मुंबई - नराधम चालकाने डॉक्टरच्या मुलीसह तिच्या आई आणि बहिणीचाही खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना कांदीवलीतील ( Kandivali Crime ) दळवी रुग्णालयात आज सकाळी उघडकीस आली. किरण दळवी, मुस्कान दळवी आणि भूमी दळवी असे नराधमाने खून केलेल्या मायलेकींची नावे आहेत. तर तिघींचा खून केल्यानंतर नराधम चालकानेही आत्महत्या ( killed ) केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
कांदिवलीतील दळवी रुग्णालयात आढळून आले चार मृतदेह - आज सकाळी कांदिवलीतील दळवी रुग्णालयात ( hospital ) चार मृतदेह आढळून आल्याने परिसरात हाहाकार उडाला होता. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलीस ( Kandivali Police ) ठाण्यातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शीव दयाल सेन यांचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहांना पुढील उत्तरीय कारवाईसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
गळा दाबून नराधमाने केला खून - शीव दयाल सेन हा डॉक्टर दळवी यांच्याकडे चालक आहे. त्याचा भूमीसोबत बोलण्यावरुन किरण दळवीसोबत वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या वादातूनचे शीव दयाल सेनची किरण यांच्यासोबत झटापट झाली. त्यानंतर शीवने किरणचा गळा दाबून खून केला. त्यानंतर शीव दयाल सेनने मुस्कान आणि भूमीचाही गळा दाबून खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - Roorkee Gangrape Case : धक्कादायक..! चालत्या कारमध्ये आई आणि 6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार