ETV Bharat / city

100 टक्के लसीकरणासाठी पालिकेचा कृती आराखडा

author img

By

Published : Nov 5, 2021, 4:35 PM IST

मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. मुंबईकरांचे 100 टक्के लसीकरण जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी पालिकेने एक कृती आराखडा तयार केला आहे.

100 टक्के लसीकरणासाठी पालिकेचा कृती आराखडा
100 टक्के लसीकरणासाठी पालिकेचा कृती आराखडा

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. मुंबईकरांचे 100 टक्के लसीकरण जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी पालिकेने एक कृती आराखडा तयार केला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना दिली.

लसीकरणाचे लक्ष्य अपूर्ण -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च माहिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. गेल्या दीड वर्षात मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. या दीड वर्षाच्या कालावधीत 7 लाख 57 हजार 34 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 16 हजार 265 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. गेल्या 9 महिन्यांत 89 लाख 8 हजार 598 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 53 लाख 83 हजार 945 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 3 नोव्हेंबरपर्यंत एकूण 1 कोटी 42 लाख 92 हजार 543 लसीचे डोस देण्यात आले आहेत. पालिकेने दिवाळी पूर्वी 100 टक्के मुंबईकरांना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष ठेवले होते. मात्र दिवाळीनिमित्त 4 दिवस लसीकरण बंद असल्याने 100 टक्के लसीकरणाचे लक्ष पालिका पूर्ण करू शकलेले नाही. येत्या जानेवारीपर्यंत मुंबईत 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.

असा असेल कृती आराखडा -
मुंबईत 266 लसीकरण केंद्रा मार्फत लसीकरण केले जात आहे. सध्या 99 टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर 61 टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. येत्या जानेवारीपर्यंत 100 टक्के लसीकरण केले जाईल. त्यासाठी डी सेंट्रलाईज पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे.10 ते 20 इमारती, स्लम असतील अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले जाईल. मोबाईल व्हॅनमध्ये लसीकरण केले जाणार आहे. ज्या सोसायटीमध्ये लसीकरण झाले नाही अशा ठिकाणी पालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत जागृती करून लसीकरण करण्यास सांगितले जाणार आहे. कॉलेजमधील विद्यार्थी शिक्षक यांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. 3 लाखाहून अधिक नागरिक असे आहेत ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही अशी माहिती पुढे येत आहे अशा नागरिकांना वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून फोन करून लसीकरण करण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

7 लाख 57 हजार नागरिकांना कोरोना -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. गेल्या दीड वर्षात 7 लाख 57 हजार 34 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यामधील 7 लाख 34 हजार 859 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 16 हजार 265 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 1780 दिवस इतका आहे. सध्या 3 हजार 370 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

असे झालेय लसीकरण -
पहिला डोस - 89 लाख 8 हजार 598
दोन्ही डोस - 53 लाख 83 हजार 945
एकूण डोस - 1 कोटी 42 लाख 92 हजार 543

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.