मुंबई - रविवारी सकाळीच मुंबईतील भांडुप ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज रविवार असल्याने मेगाब्लॉक आहे, यातच रुळाला तडे गेल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.
![railway route get Broken between Bhandup to Kanjur railway line](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4306379_a.jpg)
हेही वाचा... कोकणातील गणेशभक्तांसाठी मुबंई-गोवा महामार्गावरील जड वाहतूक बंद, रावतेंची घोषणा
रेल्वे रूळाला तडे गेल्याने मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली. 12 वाजेपर्यंत ही सेवा बंदच असणार आहे. कांजूरमार्ग ते भांडुप स्थानकाच्या दरम्यान जलद मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रुळाला मोठा तडा गेला असून हा रूळ तुटल्याचे दिसत आहे. याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यानंतर कर्मचाऱ्यांनी रूळ दुरुस्तीच्या कामाला लगेचच सुरुवात केली. यामुळे जलद मार्गावरील वाहतूक सध्या धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. उद्या सोमवारी गणेशोत्सव असल्याने मोठ्या संख्येने गणेशभक्त खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत परंतु, रेल्वेच्या या घटनांमुळे त्यांना समस्यांना समोर जावे लागत आहे.
हेही वाचा... मुंबईत पुरातन गणेश मूर्ती, चित्रे व वस्तूंचे भरले प्रदर्शन
हेही वाचा... यंदा लालबागचा राजा अंतराळात; 'हे' दृश्य बघून तुम्हालाही वाटेल अभिमान