मुंबई - शहर पोलिसांच्या समाजसेवा शाखेने केलेल्या विविध कारवाईत गेल्या आठ दिवसांमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात पोलिसांनी केलेल्या अशाच एका कारवाई दरम्यान सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या सेक्स रॅकेटमध्ये बॉलीवूड कनेक्शन असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.
हेही वाचा... वाशिम जिल्हा परिषद : राष्ट्रवादीचे ठाकरे अध्यक्ष, तर उपाध्यपदी काँग्रेसचे डॉ. शाम गाभणे
गेल्या काही दिवसात दिंडोशी, वर्सोवा या ठिकाणी धाडी मारून सेक्स रॅकेट संदर्भात कारवाई करण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरा मुंबईतील अंधेरीतल्या ड्रॅगन फ्लाय या हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये बॉलिवूड क्षेत्रातल्या अनेक वेबसिरीज त्याबरोबर मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुलींचा समावेश असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मारलेल्या धाडीत तीन मुलींची पोलिसांनी सुटका केलेले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा सुद्धा समावेश आहे.
हेही वाचा... मुंबईत 26 जानेवारीपासून 'नाईट लाईफ'
या ठिकाणी चालणारे सेक्स रॅकेट प्रिया शर्मा नावाची एक महिला एजंट चालवत असल्याचे उघडकीस आले. दिल्लीतील विनय, कुलदीप जेनी व आवेश या एजंटच्या संपर्कात येऊन बॉलिवूड, टिव्ही सिरीयल व वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या मुली वेश्या व्यवसासाठी पाठवण्यात येत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.
हेही वाचा... योगेश सोमण प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले पत्र
पोलिसांनी प्रिया शर्मा हिला अटक केली असून ती कांदिवली पूर्व येथे विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी चालवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलीस आवेश, कुलदीप जेनी व विनय या तीन फरार आरोपींचा शोध घेत आहेत.