ETV Bharat / city

Police Transfer : सात पोलिसांची तडकाफडकी बदली; मुंबई पोलीस आयुक्तांची कारवाई - पोलीस आयुक्त संजय पांडे

मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीला कथित मारहाण केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे ट्विटद्वारे ही तक्रार करण्यात आली होती.

मुंबई पोलीस
मुंबई पोलीस
author img

By

Published : Apr 5, 2022, 12:01 PM IST

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सात पोलिसांची तडकाफडकी बदली केली आहे. मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीला कथित मारहाण केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे ट्विटद्वारे ही तक्रार करण्यात आली होती. समता नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र पडवळ, पोलीस उपनरीक्षक भागवत व्यवहारे पोलीस शिपाई निलेश राजापुरे, अंजली गवळी, अशोक गाढवे आणि प्रशांत ठाकूर यांची नायगाव विभागात बदली करण्यात आली आहे.

कर्नाटकात गुन्हा दाखल - पोलिसांनी देखील संबंधित व्यक्तीवर कर्नाटकात गुन्हा दाखल असल्याचे म्हटले आहे. बदलीच्या कारवाईने पोलिसांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. संजय पांडे यांच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीच्या मुलीने तक्रार केली होती. कांदिवलीतील एक व्यक्ती पासपोर्ट नूतनीकरणासाठी समतानगर पोलीस ठाण्यात आली होती. पोलिसांनी कागदपत्रांची शहानिशा केली असता त्याच्यावर कर्नाटकात गंभीर गुन्हा दाखल आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळं पोलिसांनी अर्जावर काहीच कारवाई केली नसल्याची माहिती होती.

ट्विटरवरून कारवाई - गेल्या एक महिन्यापासून पोलीस आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू असल्याचे म्हटले जाते. या वादातून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार संबंधित व्यक्तीच्या मुलीने संजय पांडे यांच्याकडे केली होती. यानंतर संजय पांडे यांनी पोलिसांची बदली केलीय. संजय पांडे यांनी संबंधित मुलीच्या तक्रारीवरुन बाजू ऐकून न घेता बदली करण्याचे आदेश दिल्याची चर्चा सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मोहिते यांच्याकडे तपास करुन अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय पांडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या संपर्कात असतात. मुंबईकरांकडून ते विविध सूचना मागवत असतात. या सात पोलिसांवर कारवाई देखील ट्विटरवर केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.