मुंबई- सायन येथील एका नर्सिंग होममध्ये १५ दिवसांच्या मुलीची अवैध तस्करी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई पोलिसांनी अटक केली. दोन फोनसह २० हजार रुपयांची रोकड जप्त केली. नर्सिंग होमची कार्यपद्धती आणि भूमिका तपासण्यासाठी तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) सांगितले.
15 दिवसांच्या बालिकेला विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा महिलांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या मुलांना दत्तक घेण्याचा प्रकार उघडकीस आला ( Adopt by illegal way ) आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 महिलांना केली अटक 15 दिवसाची नवजात मुलीची सुटका करण्यात आली आहे. जीटीबी नगर परीसरात स्थित आहाना नर्सिंग होममधील प्रकरण आहे. नवजात मुलांची खरेदी विक्री होत असल्याचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीकडून 2 हजार रोख आणि 15 हजार किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या रॅकेटचे मास्टर माईंड कोण आहे, या शोध मुंबई पोलीस ( Mumbai police ) घेत आहेत.