मुंबई - मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) अमली पदार्थ विरोधी कक्षच्या आझाद मैदान पथकाने ( Azad Maidan ) मस्जिद बंदर ( Masjid Bandar Area) परिसरातून एका नायजेरियन व्यक्तीकडून ( Nigerian Person ) 110 ग्रॅम कोकेन ( Drugs ) जप्त केले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 33 लाख रुपये आहे.
बोयेगा हबीब अबुबकर (वय 47 वर्षे), असे अटक ( Mumbai Police Arrested a Nigerian Person ) करण्यात आलेल्या व्यक्तीने नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो पालघर ( Palghar ) येथे एका घरात राहतो. कपडे विकण्याच्या नावाखाली तो अमली पदार्थाची तस्करी करत होते. नववर्षाच्या ( New Year 2022 ) स्वागतासाठी साजरा होणाऱ्या मेळाव्यासाठी या अमली पदार्थाची तस्करी होत होती, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पुण्यातही दोघांना अटक
पुणे पोलिसांच्या ( Pune Police ) अमली पदार्थ विरोधी पथक विभागाने पुणे रेल्वे स्थानक ( Pune Railway Station ) परिसरातून तब्बल 17 लाख 85 हजार 200 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन ( Drugs ) जप्त केले. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा - Maharashtra Shakti Law : राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या संमतीनंतर 'शक्ती'ची अंमलबजावणी