मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार होत्या. त्यासाठी वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली होती. ही वॉर्ड पुनर्रचना नंतर राज्य सरकारने रद्द केली आहे. या वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी पालिकेने तब्बल 27 लाख 10 हजार रुपये खर्च केले असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक कार्यालयाने दिल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे.
27 लाखांचा खर्च : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. यावर पालिकेने एकूण 27 लाख 10 हजार रुपये खर्च केले आहे. यात वॉर्ड पुनर्रचनेसाठी भौगोलिक सिमा प्रसिद्ध करण्यासाठी शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय व सूचना या कार्यक्रमासाठी 19 लाख 87 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच सूचना व हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी हॉलच्या भाड्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांना 3 लाख 97 हजार रुपये देण्यात आले. अधिकारी कर्मचारी यांच्या भोजनासाठी मेसर्स सेंट्रल कॅटरर्सला 1 लाख 53 हजार रुपये देण्यात आले आहेत. व्हिडिओ शूटिंग, एलईडी स्क्रीन करिता मेसर्स आरंभ इंटरप्रायझेसला 1 लाख 52 हजार रुपये देण्यात आले आहेत. स्टेशन करीता वसंत ट्रेडर्स यांना 18 हजार, मेसर्स विपुल यांना 189 रुपये देण्यात आल्याचे कळविले आहे.
खर्च वाया गेला : राज्य सरकारने सीमा रद्द केल्या आणि त्यामुळे मुंबईकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी झाली आहे. वॉर्ड पुनर्रचनेसाठी नियोजन न करता केलेला खर्च वाया गेला आहे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
हेही वाचा - Shivsena Vs Somaiya : 'गली गली शोर है किरीट सोमैया...'; ठाण्यात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा