मुंबई - वरळी, कोळीवाडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने वनरूपी क्लिनिकच्या माध्यमातून स्क्रिनिंग करत रुग्णांना शोधून काढले. आता याच वनरूपी क्लिनिकने पालिकेच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन बीडीडी' हाती घेतले आहे. त्यानुसार आठवड्याभरात येथील 46 हजार 600 रहिवाशांचे स्क्रिनिंग पूर्ण करत 178 संशयित रुग्ण शोधून काढले आहेत. यामुळे बीडीडी चाळीतील संसर्गाची साखळी मोडण्यास मदत होत आहे.
वरळी, कोळीवाडा येथे वनरूपी क्लिनिककडून 1 लाख रहिवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. आता त्यांनी आपला मोर्चा बीडीडीकडे वळवला आहे. कारण 15 दिवसांपूर्वी बीडीडीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते. अशात बीडीडी चाळ ही अंदाजे 60 एकर जागेवर पसरली असून यात 9860 खोल्या आहेत. तर 121 इमारती आहेत. अंदाजे 100 दुकाने असून 300 झोपड्याही या परिसरात आहेत. 180 चौरस फुटाची घरे या चाळीत असून प्रत्येक मजल्यावर सार्वजनिक शौचालय आहे. एकूणच यामुळे फिजिकल डिस्टनसिंगचे नियम पाळता येत नाहीत आणि संसर्ग वाढतो. हीच बाब लक्षात घेत पालिकेने 10-12 दिवसांपूर्वीच बीडीडी चाळ सील केली आहे.
चाळ सील केल्यानंतर मागील सोमवारी येथे स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत डॉक्टरांच्या चार पथकांच्या माध्यमातून 46 हजार 500 रहिवाशांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले असून त्यात 178 संशयित रूग्ण आढळले आहेत. या रुग्णांची माहिती पालिकेला देण्यात आली असून पालिका पुढील कार्यवाही करत आहे, अशी माहिती वनरूपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. राहुल घुले यांनी दिली आहे. पुढच्या तीन-चार दिवसांत हे काम पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले आहे.
वनरूपी क्लिनिकचे 'मिशन बीडीडी' जोरात, आतापर्यंत 46 हजार 600 नागरिकांची तपासणी
वनरूपी क्लिनिकने पालिकेच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन बीडीडी' हाती घेतले आहे. त्यानुसार आठवड्याभरात येथील 46 हजार 600 रहिवाशांचे स्क्रिनिंग पूर्ण करत 178 संशयित रुग्ण शोधून काढले आहेत.