ETV Bharat / city

Nalesafai in Mumbai : नालेसफाईकरिता मुंबई महापालिकेची तयारी; गाळ काढण्यासाठी पालिका करणार १५० कोटीचा खर्च - मुंबई नालेसफाई 150 कोटी कंत्राट

यंदा नाले सफाईच्या कामांसाठी पालिका दीडशे कोटी रुपये खर्च ( Rs 150 crore for Nalesafai ) करणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेस मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रणासाठी कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे ( MPCB order on Mithi cleaning ) आदेश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेतर्फे मिठी नदी विकास आणि प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या अंतर्भूत कामाचा कृती आराखडा प्रदूषण मंडळाला सादर केला ( BMC praposal for Mithi cleaning ) आहे.

नालेसफाई
नालेसफाई
author img

By

Published : Feb 28, 2022, 9:26 PM IST

मुंबई - यंदा पालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करण्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मुंबईतील विविध भागातील छोटे मोठे नाले, तुंबणाऱ्या पर्जन्यजलवाहिन्या, रस्त्यांवरील जलमुखे तुंबत असल्याने त्यांचा निचरा करण्यासाठी गाळ काढण्याचे काम केले जाणार ( Nalesafai in Mumbai ) आहे.

मुंबईत दरवर्षी पावसापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा पालिकेकडून ( Nalesafai work in Mumbai ) केला जातो. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होते. मुंबईची तुंबई झाल्याने मुंबईकरांकडून संताप ( Mumbaikar anger on Nalesafai issue ) व्यक्त केला जातो.

मुंबईची तुंबई -
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना समोर येतात. समुद्राकडे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये गाळ व कचरा साचल्याने त्या तुंबून राहतात. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. याचा परिमाण म्हणून पावसाचे पाणी शहरात साचून राहून मुंबईची तुंबई होते. त्यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातर्फे दरवर्षी नालेसफाईची कामे केली जात असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र वेळेत नाले सफाईची कामे होत नाहीत शिवाय नाल्यातील संपूर्ण गाळ काढला जात नाही. यावरून सत्ताधारी - विरोधकांमध्ये अनेकवेळा वादही रंगला आहे.

हेही वाचा-Amul Milk Rate : अमुलचे दूध 'या' दिवसापासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढणार

दीडशे कोटी रुपये खर्च करणार -
यंदा नाले सफाईच्या कामांसाठी पालिका दीडशे कोटी रुपये खर्च ( Rs 150 crore for Nalesafai ) करणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेस मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रणासाठी कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे ( MPCB order on Mithi cleaning ) आदेश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेतर्फे मिठी नदी विकास आणि प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या अंतर्भूत कामाचा कृती आराखडा प्रदूषण मंडळाला सादर केला ( BMC proposal for Mithi cleaning ) आहे. या कृती आराखड्याचे पालन न झाल्यास पालिकेस प्रत्येक पातमुखामागे प्रत्येक महिन्यास दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे, नालेसफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिकेचा प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा-ED Summons Kaptan Malik : कप्तान मलिकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितला वेळ

तीन टप्प्यांत काम -
नालेसफाईच्या कामातील पहिला टप्पा हा पावसाळापूर्व असून त्या कामास सुरुवात झाल्यापासून ३१ मे २०२२ पर्यंत वार्षिक कामाच्या अनुषंगाने ७५ टक्के गाळ काढण्यात येतील. दुसरा टप्पा हा पावसाळ्यातील असून त्याचे काम १ जून रोजी सुरू होऊन ३० सप्टेंबर रोजी संपेल. त्यात १५ टक्के गाळ काढला जाणार असून तिसरा टप्पा १ ऑक्टोबर रोजी सुरू होऊन ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपेल. त्यात उर्वरित १० टक्के गाळ काढण्यात येईल.

हेही वाचा-छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच भेट झाली नाही; श्रीपाल सबनीस यांनी सांगितला इतिहास

असा केला जाणार खर्च -
- दादर, एल्फिन्स्टन, परळ, माटुंगा येथे सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
- कुलाबा, सँडहर्स्ट रोड, मरिन लाइन्स, ग्रॅन्ट रोड, भायखळा येथे २ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
- चेंबूर पूर्व आणि पश्चिम भागात १७ कोटी ७९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
- मुलुंड भागात ९ कोटी ४६ लाख रुपये
- पश्चिम उपनगरातील खार, वांद्रे, अंधेरी पूर्व-पश्चिम, गोरेगाव, मालाड, कांदिवली, दहिसर पट्ट्यात ८६ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.