ETV Bharat / city

Kashmir Files Movie : मुंबई उच्च न्यायालयाने कश्मीर फाइल्स चित्रपटाविरुद्ध दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली

हिंदू -मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊन देशात हिंसाचार घडेल अशी शक्यता व्यक्त करत काश्मीर फाईल्स या आगामी चित्रपटाच्या ( Kashmir Files Movie ) प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली ( PIL Against Kashmir Files ) होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) ही याचिका फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Mar 8, 2022, 9:24 PM IST

मुंबई- काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित 'कश्मीर फाइल्स'या चित्रपटाच्या ( Kashmir Files Movie ) प्रदर्शनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली ( PIL Against Kashmir Files ) होती. सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विवय जोशी यांच्या खंडपीठासमोर ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी सादर करण्यात आली होती. त्यावर आज मंगळवारी रोजी तातडीनं सुनावणी घेण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) ही याचिका फेटाळून लावली आहे.

काश्मिरी पंडितांच्या हत्येवर चित्रपट

कश्मीर फाइल्स हा चित्रपट साल 1989 आणि 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर थेट भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेत उत्तर प्रदेशचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित असल्याचं भासत आहे. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचं याचिकेत म्हटलेलं होत.

हिंसाचार घडण्याची शक्यता

संपूर्ण चित्रपटात त्या काळात घडलेल्या घटनांवर एकतर्फी भाष्य करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे हिंदू समुदायाची माथी भडकू शकतात आणि देशभरात हिंसाचार घडू शकतो. सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका आणि निकाल होत असताना, राजकीय पक्षांकडून या मुद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्वत्र जातीय हिंसाचार वाढू शकतो. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची तसेच याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर त्वरित सगळीकडून हटवून टाकावा अशी विनंती याचिकाकर्त्याकडून करण्यात आली होता. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

११ मार्चला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाइल्स चम दिग्दर्शन केलं असून त्यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. येत्या शुक्रवारी 11 मार्चला चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.