मुंबई : भारतीय समाजात कावळ्यांसंबंधीत काही शुभ आणि अशुभ मान्यता आहे. बहुतांश लोकांमध्ये कावळा अशुभ मानले जातात. मात्र, मुंबईतील ग्रेस कुटूंबियांनी या अंधश्रद्धेला छेद देत एका दिव्यांग कावळ्याचा जोरदार वाढदिवस साजरा (Support of Grace family and crow in Mumbai) केला. आणि पक्षी प्रेमाचं एक मोठं उदाहरण समाजासमोर ठेवलेले आहे. त्यांनी चार वर्षांपूर्वी या जखमी कावळ्याचा उपचार केला होता. तेव्हापासून हा दिव्यांग कावळा त्यांच्याच घरातील सदस्य झाला. दिव्यांग अवस्थेत असलेल्या या कावळाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली (special story of Grace family and disabled crow)आहेत.
दुखापत झालेला कावळा : मुंबईतील दादरचा नायगाव परिसरात डायमंड ग्रेस आणि त्यांची पत्नी इस्टर ग्रेस राहतात. सप्टेंबर २०१८ ला त्यांच्या बाल्कनीत जखमी अवस्थेत एक कावळा आला होता. त्या कावळ्याच्या एका डोळ्यात गंभीर दुखापत झालेली होती. ईस्टर ग्रेस त्या कावळ्याला घरात घेऊन आले. त्याच्यावर उपचार करून नंतर सोडून दिले. मात्र, दोन ते तीन दिवसानंतर तो कावळा पुन्हा बाल्कनीतून सरळ घरात आला. त्याच्या एका डोळ्यात जंतूसंसर्ग देखील झाला होता. तेव्हा ग्रेस दाम्पत्याने त्याला पशु वैद्यकाकडे नेले आणि त्याच्यावर उपचार केले. मात्र, तोपर्यंत त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला (disabled crow) होता. ग्रेस दाम्पत्याने त्या कावळ्याची अवस्था बघून अत्यंत वैदना झाला होत्या.
आणि तो त्यांचा कुकु झाला : कावळ्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाल्याने त्याला बरोबर दिसत नव्हते. तो बाहेर गेला असता, तर त्याला खायला मिळाले नसते. इतकेच नव्हे तर त्याला दुसऱ्या कावळ्यांनी मारले देखील असते, अशी भीती ग्रेस दाम्पत्याला होती. तो कावळा सुद्धा घर सोडून जात नव्हता. तेव्हापासून आमच्या घरातील तो रहायला लागला. तेव्हा आम्ही त्या कावळ्याचे 'कुकू' असे नामकरण केले आहे. आज आम्ही सर्व 'कुकू', म्हणून त्याला हाक मारतोय. त्याला तो प्रतिसाद सुद्धा देतोय, अशी माहिती इस्टर ग्रेस यांनी ईटीव्ही भारतला दिली (Support of Grace family for disabled crow) आहे.
आक्टोबर महिन्यात कुकूचा वाढदिवस : इस्टर ग्रेस यांनी सांगितले की, आम्ही दरवर्षी ७ आक्टोबर कुकूचा वाढदिवस साजरा करतोय. आतापर्यत चार वाढदिवस आम्ही साजरे केले आहेत. यंदा आम्ही अत्यंत साध्यापद्धतीने केक आणून कुकूच वाढदिवस साजरा केला आहे. कुकूची आम्हाला सवय लागली आहे. मी घरातून बाहेर गेली तर जोरजोराने ओरडतो. नाईलाजास्तव माझ्या घरातील सदस्य मला व्हिडिओ कॉल करून कुकुशी बोलावं लागते. मी त्याला कुकू, चिकू, शोनूबाबा, असे म्हटलं, की कुकू शांत होतो.
कुकूची अशी आहे दिनचर्या : इस्टर ग्रेस यांनी सांगितले की, कुकू जेवणाची, व्यायामाची आणि झोपण्याची वेळ नित्यनेमाने पाळतोय. सकाळी उठल्यावर तो गॅलरीत असलेल्या बांबूवर बसतोय. त्यानंतर १०. ३० वाजता त्यांच्याकडून आम्ही व्यायाम करू घेतोय. दररोज माझ्या हातावरून उडण्याचा २० स्टेप करतोय. त्यानंतर आंगोळं करून देतो. आंघोळींनंतर कुकू उन्हात जाऊन बसतोय, दुपारी १:३० वाजता आमचा बरोबर जेवण करतोय. त्याला जेवणात चिकन, मटण, सुकट, अंडी आणि कलिंगड देतोय. जेवणानंतर गॅलरी कुकूसाठी छोटा फॅन लावला आहे. तिथे तो विश्रांती घेतोय.
कुकूचे मित्र घड्याळवाला : डायमंड ग्रेस सांगतात की, कुकूला मित्र सुद्धा आहे. बाल्कनीत कुकूचे मित्र असलेले एक कावळा आणि खारुताई दररोज येतात. त्यांच्याबरोबर कुकू दररोज खेळतो, आम्ही त्याच्या एका कावळा मित्राचे नाव घड्याळवाला म्हणून ठेवले आहे. दररोज सायंकाळी ४:३० वाजता हा घड्याळवाला येतो. काव-काव करतोय नंतर कुकू आणि खारुताई (special story) खेळतात.
ग्रेस कुटुंब आणि कुकुच ट्युनिंग : डायमंड ग्रेस यांचा मुलगा जॉर्ज ग्रेस सांगतात की, कुकू तीन वर्षपासून आमच्या घरातील सदस्य झाला आहे. माझ्या आई-वडिलांचाच एक मुलगा आहे, असे मला वाटते. आई- वडील दोघेही कुकूची सेवा करतात. त्यांमुळे त्यांच्या चांगला व्यायाम सुद्धा होतो आहे. कधी आई-वडील घराबाहेर गेले की तो त्यांना शोधत बसतो. विशेष म्हणजे कुकूला जरी बोलता येत नसले तरी त्याला काय हवे आहे? ते त्याच्या हावभावावरून आम्हाला कळते.
चार वर्षांपासून कुकुचा सांभाळ : यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना डायमंड ग्रेस सांगतात की, कुकू आम्हाला जेव्हा मिळाला तेव्हा तो जखमी होता. या मुक्या प्राण्यांचे वेदना मला कळाल्या. त्यानंतर माझी पत्नी आणि मी दोघे मिळून याला सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. गेली चार वर्षांपासून तो आमचा घरातील सदस्य आहे. मुके प्राणी वाचवण्यासाठी समाजतील नागरिकांनी पुढे यावे. जर कधी तुम्हाला असा जखमी अवस्थेत पक्षी किंवा प्राणी दिसला तर प्राणी प्रेमींना त्याची माहिती द्यावी.
कावळ्या विषयी चुकीची धारणा का ? सामान्यपणे आपल्याकडे पोपट, लव्ह बर्ड्स, आदी पक्षीच पाळले जातात. शिवाय कबुतरांनाही अनेकजण खाऊ घालतात. कबुतराशी संबंधित अनेक कथा-परंपरा सांगितल्या जातात. त्यांना दाणे खाऊ घालणे आजही भारतीय परंपरेचा भाग मानले जाते. कावळेही भारतीय परंपरेचा भाग आहे, मात्र त्याबाबत नकारात्मक भावना अधिक आहे. कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्यास पितरांना मोक्ष मिळतो अशी धारणा आहे. पितृपक्षच्या कालावधीत आपले पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर येतात, यावेळी त्यांचे आवडीचे पदार्थ बनवून त्यांना नैवैद्य दाखवला जातो. पुराणकथांनुसार इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते.
आतापर्यंत झालेलं संशोधन : २०१६मध्ये मुंबईत विविध प्रजातींचे २१५ पक्षी आढळून आले होते. २०२० मध्ये ही संख्या १९२ वर आली आहे. पक्ष्यांच्या अधिवासाचा होणारा नाश आणि अनिर्बंध विकास या बाबी पक्ष्यांच्या घटत्या संख्येला कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. बीएनएचएसच्या माहितीनुसार भारतात साधारण कावळा, जंगल कावळा, डोम कावळा, पांढरा कावळा, हिमालयीन जंगल कावळा, हिमालयीन कावळा, तपकिरी मानेचा डोम कावळा, पिवळ्या चोचीचा कावळा व लाल चोचीचा कावळा आढळतात. महाराष्ट्रात काळा कावळा, जंगल कावळा, डोम कावळा या तीन प्रमुख जाती आढळतात. हे कावळे उकिरड्यावर टाकलेले अन्न, विष्ठा, लहान पक्षी, त्यांची अंडी व मेलेल्या प्राण्यांचे मांस असे कुठलेही अन्न कावळ्यांना चालते. एप्रिल ते जून हा त्यांचा विणीचा काळ असतो. कावळे समाजप्रिय असतात व वेळोवेळी एकत्र जमतात.
कावल्यामुळे पर्यावरण स्वच्छ : निसर्ग स्वच्छ ठेवणाऱ्या पक्ष्यांमध्ये कावळ्याची गणना केली जाते. कारण ते कुजलेले अन्न आणि अन्नाच्या स्वरूपात काटे खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवते. अनेक देशात स्वच्छतेचे काम कावळ्याला प्रशिक्षण देऊन केले जाते. नेदरलँड्समध्ये एक कावळा सिगारेट किंवा तत्सम वस्तू उचलतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो. कावळा हा साधा दिसणारा पक्षी आहे. हा एक अतिशय बुद्धिमान आणि वेगवान पक्षी आहे. या पक्षाला माणसांची चेहरे आणि आवाज ओळखता येतात. याचे उदाहरण ग्रीस कुटूंबीय आहेत.