ETV Bharat / city

लग्नानंतर त्रास देणाऱ्या प्रियकराचा उंदीर मारण्याचे विष देऊन काढला काटा - मुंबई

काही वर्षांपूर्वी काजलच्या वडिलांनी काजलचे साताऱ्यातील कराड या ठिकाणी परस्पर लग्न लावून दिले होते. मात्र, लग्नानंतरही विजय नाकटे हा काजलच्या संपर्कात होता.

mumbai crime news woman kills lover who was torturing her after marriage by poisoning him with rat-kill
author img

By

Published : Aug 14, 2019, 4:42 PM IST

Updated : Aug 14, 2019, 7:42 PM IST

मुंबई - लग्नानंतर त्रास देणाऱ्या प्रियकराचा उंदीर मारण्याचे द्रव्य अन्नात मिसळून काटा काढल्याची घटना वडाळा परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी महिलेला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वडाळा परिसरातील, राजीव गांधी नगर या ठिकाणी असलेल्या मैदानात पोलिसांना प्रियकर विजय नाकटे या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही जखमा नसल्याने, या संदर्भात प्राथमिक चौकशीत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

लग्नानंतर त्रास देणाऱ्या प्रियकराचा उंदीर मारण्याचे विष देऊन काढला काटा

मृत विजय नाकटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता, विजयचा मृत्यू हा विष पोटाच गेल्याने झाला असल्याचे समोर आले. या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता, मृत विजय याचे त्याच्या परिसरात राहणाऱ्या काजल या महिलेसोबत प्रेम संबध असल्याचे पोलिसांना कळले. काही वर्षांपूर्वी काजलच्या वडिलांनी काजल हिचे परस्पर साताऱ्यातील कराड या ठिकाणी लग्न लावून दिले होते. मात्र, लग्नानंतरही विजय नाकटे हा काजलच्या संपर्कात होता.

mumbai crime news, मुंबई
मृत विजय नाकटे

असा काढला काटा..
विजय प्रत्येकवेळी दारू पिऊन "तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्या जवळ ये" असे काजलला सांगत असे. या दरम्यान काजल 15 जुलैला मुंबईतील वडाळा परिसरातील तिच्या माहेरी आल्यावर, विजयने दारूच्या नशेत तिच्या घरी जाऊन तिला नवऱ्याला सोडून आपल्याकडे येण्यास सांगितले. या त्रासाला कंटाळलेल्या काजलने विजयला रात्री जेवायला घरी बोलावून, आमटीत उंदीर मारण्याचे विष मिसळले. जेवणानंतर काजलने विजयला दारू पिण्यास दिली. काही वेळातच विजय बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच, तिने त्याला राजीव गांधी नगर मधील मैदानात आणून ठेवले.

मृतदेहाशेजारी ठेवलेल्या चपलेवरून पोलिसांना आला संशय..
ज्या ठिकाणी विजयचा मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी विजयच्या पायातील चपला सरळ होत्या. एखादी व्यक्ती जर जमिनीवर तडफडत पडली असेल, तर तिच्या चपला पायात आढळणार नाहीत. याच गोष्टीवरून पोलिसांनी चपलेवरील हातांचे ठसे घेऊन तपास केला असता, धागेधोरे काजलपर्यंत पोहचले, त्यानंतर पोलिसांनी काजलला अटक केली.

Intro:लग्न झाल्यानंतर प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या करणाऱ्या महिला आरोपीला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वडाळा परिसरातील राजीव गांधी नगर या ठिकाणी असलेल्या मैदानात पोलिसांना विजय नाकटे या युवकाचा मृतदेह आढळुन आला होता. मात्र मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही जखमा नसल्याने या संदर्भात प्राथमिक चौकशीत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.
Body:मयत विजय नाकटे याचे शव पोस्ट मार्टम साठी पाठविला असता विजय चा मृत्यू हा विष घेतल्याने झाला असल्याचे समोर आले होते. या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता मयत विजय याचे त्याच्या परिसरात राहणाऱ्या काजल पाटील या महिलेसोबत प्रेम संबध असल्याचे पोलिसांना कळले. काही वर्षांपूर्वी काजल हिच्या वडिलांनी काजल हिचे परस्पर साताऱ्यातील कराड या ठिकाणी लग्न लावून दिले होते.मात्र लग्नानंतरही विजय नाकटे हा काजल हिच्या संपर्कात होता.

आरोपी काजल हिला विजय प्रत्येक वेळी दारू पिऊन "तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्या जवळ ये" म्हणून सांगत होता. या दरम्यान काजल ही 15 जुलै रोजी मुंबईतील वडाळा परिसरातील तिच्या माहेरी आल्यावर विजय याने दारूच्या नशेत घरी येऊन तिच्या नवऱ्याला सोडून आपल्याकडे येण्यास सांगितले. या दरम्यान कंटाळलेल्या काजल हिने विजय यास रात्री जेवायला घरी बोलाऊन आमटीत उंदीर मारण्याचे विष मिसळले. जेवण उरकून विजय यास काजल हिने दारू पिण्यास दिली होती. काही वेळातच विजय हा बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच त्याचा मृतदेह राजीव गांधी नगर मधील मैदानात आणून ठेवला. Conclusion:मृतदेहा शेजारी ठेवलेल्या चपलेवरून पोलिसांना आला संशय

ज्या ठिकाणी मयत विजय याचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी विजय याच्या पायातील चपला ह्या सरळ ठेवण्यात आल्या होत्या. एखादी व्यक्ती जर जमिनीवर तडपडत पडली असेल तर त्याच्या चपला एका ठिकाणी आढळणार नाही. ह्याच गोष्टीवरून पोलिसांनी चपलेवरील हातांचे ठसे घेऊन तपास केला असता पोलिसांनी काजल पाटील हिला अटक केली आहे.
Last Updated : Aug 14, 2019, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.